रशियाची प्रभावी लस स्पुतनिकची पहिली खेप भारतात १ मे रोजी, यात ८५ कोटी डोस

RDIFने भारतीय निर्मात्यांसोबत प्रत्येक वर्षी 85 कोटी लस तयार करण्याचा करार केला आहे.  

Updated: Apr 27, 2021, 04:26 PM IST
रशियाची प्रभावी लस स्पुतनिकची पहिली खेप भारतात १ मे रोजी, यात ८५ कोटी डोस title=

मुंबई :  लवकरचं लसीकरणाच्या नव्या टप्प्याला सुरूवात होत आहे. भरताला नवी रशियन कोरोना प्रतिबंधात्मक Sputnik-V लस मिळणार आहे. 1 मेपासून ही नवी  Sputnik-V लस भारतात दाखल होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती रशियन डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे (RDIF) अध्यक्ष किरील दिमित्रीव यांनी दिली आहे. ते म्हणाले,  'स्पुतनिक लसीचे पहीली डोस 1 मे रोजी भारतात दाखल होणार आहेत.' रशियाकडून मिळणारी लस कोरोनावर अत्यंत प्रभावी आसून, कोरोनाशी लढायला लस उपयुक्त ठरेल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, RDIFने भारतीय निर्मात्यांसोबत प्रत्येक वर्षी 85 कोटी लस तयार करण्याचा करार केला आहे.  अशात स्पुतनिक लसीचं उत्पादन लवकरचं भारतात सुरू होईल असा अंदाज देखील वर्तवण्यात येत आहे. परिस्थिती पाहाता येत्या केळात लसीची मागणी वाढू शकते. या खेपमध्ये लसीच्या किती डोसांचा समावेश असेल हे अद्याप कळू शकलेलं नाही.

जगातील पहिल्या कृत्रिम उपग्रहाप्रमाणे रशियानेही या लसीचे नाव स्पुतनिक V ठेवले आहे. ही एडीनोव्हायरसवर आधारित लस आहे, ज्याचा वापर लसीकरणासाठी मॉस्कोमध्ये मोठ्या प्रमामात होत आहे. रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन म्हणाले की, त्यांच्या एका मुलीने या लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. शिवाय स्पुतनिक लसीला 59 देशांमध्ये परवानगी देखील मिळाली आहे. 

भारतात कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयंकर आहे. दिवसागणिक रूग्णसंख्या वाढत तर दुसरीकडे मृतांची संख्या देखील वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणा अपूरी पडत आहे. भारतात कोरोनाचं थैमान पाहाता अमेरिका, ब्रिटेन आणि जर्मनीसोबतचं अनेक राष्ट्र भारताच्या मदतीला धावून आले आहेत.