धनबाद : देशभरात एक्स्ट्रा मॅरीटल अफेअरच्या (Extra Marital Affair) घटना वाढल्या आहेत. या घटनांमुळे गुन्ह्याच्य़ा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आता अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका पतीने आपल्या पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्याची घटना घडली होती. आपल्या पत्नीला एका परपुरुषासोबत पाहुन त्याला ते सहन झालं नाही आणि त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची घटना घडली. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेत पती-पत्नी (Husband-Wife) एका पोलिस ठाण्यात जेवण बनवण्याचे काम करत होते. या पोलिस ठाण्यात असलेल्या एका एसआय (Assistant Police Sub Inspector) सोबत जेवण बनवणाऱ्या महिलेसोबत अफेअर (Women Affair) होते. या अफेअरची माहिती त्या पतीला मिळाली होती. त्यामुळे अनेकदा या विषयावरून दोघांमध्ये खटके उडायची. या वादातून त्याने टोकाचे उचलंलं असल्याची माहिती आहे.
घटनाक्रम काय?
पती सेंटू चक्रवर्तीचे सात वर्षापुर्वी लग्न झाले होते.सेंटू त्याच्या पत्नीसोबत पत्नीच्या सासरीच राहत होता.दोघेही एका पोलिस ठाण्यात जेवण बनवण्याचे काम करत होते. हे जेवण बनवता बनवता सेंटूच्या पत्नीचे एएसआय अविनाश कुमारसोबत प्रेमसंबंध (Extra Marital Affair) जुळले होते. याची कुणकुण पती सेंटूलाही लागली होती.तसेच संपुर्ण पोलिस स्टेशनध्येही दोघांची अफेअरची चर्चा होती. या अफेअरवरून दोघांमध्ये खटके उडायचे.
दरम्यान एकदा पती सेंटूने पत्नीला एएसआयसोबत (Assistant Police Sub Inspector) नको त्या अवस्थेत पाहिले होते.ही घटना पाहुन त्याने पत्नीसोबत वाद घालायला सुरुवात केली. या वादानंतर पत्नीने या प्रकाराची माहीती एएसआयला दिली होती. एएसआयने या प्रकरणी सेंटूला मारहाण केली होती. या घटनेमुळे व्यथित झालेल्या सेंटूने नंतर टोकाचं पाऊल उचलंत आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली होती.
पोलिसांच म्हणण काय?
या प्रकरणी एसएचओ सुनील कुमार सिंह यांनी सांगितले की, सेंटू आणि त्याची पत्नी निरसा पोलिस ठाण्यात काम करत होते. यादरम्यान पोस्टेड कॉन्स्टेबलचे सेंटूच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध (Extra Marital Affair) सुरू झाले होते. या घटनेला कंटाळून सेंटूने टोकाचं पाऊल उचलत जीवनयात्रा संपवली. या प्रकरणाचा अधिक तपास सुरु असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येणार आहे. झारखंडच्या धनबाद येथे ही घटना घडली होती.