नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली

Extra Maritial Affair: सीमेपलीकडे पती पत्नीला मोबाईल मिळवण्यासाठी दिवसरात्र काम करत होता.

Pravin Dabholkar | Updated: Nov 2, 2023, 06:15 PM IST
नवऱ्याने गिफ्ट केला मोबाईल, फोनवर बोलत बायको प्रियकरासोबत पळाली  title=

Husband Wife News: पती आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी दिवसरात्र एक करतो, तिला छान वाटावं म्हणून गिफ्ट देतो. पण काही दिवसातच पत्नी दुसऱ्यासोबत पळून जाते. हो अशी घटना प्रत्यक्षात घडली आहे. बिहारच्या बांका जिल्ह्यात पतीला पत्नीला मोबाईल भेट देणं महागात पडलं आहे. मोबाईल मिळाल्यानंतर पत्नीला गरीब, मेहनती पतीचा विसर पडला. त्याच मोबाईलवर बोलत बोलत ती प्रियकरासह पळून गेली. या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

बांका जिल्हा पोलिसांनी या घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. ही आश्चर्यकारक प्रेमकथा अमरपूर पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावातील आहे. जिथे पीडित पती हा नेपाळमध्ये राहतो आणि मेहनतीचे काम करतो. गेल्या काही दिवसांपासून त्याची पत्नी त्याच्याकडे सतत मोबाईलची मागणी करत होती. सीमेपलीकडे पती पत्नीला मोबाईल मिळवण्यासाठी दिवसरात्र काम करत होता. तर दुसरीकडे पत्नीच्या स्वत:चा स्वार्थ साधण्यासाठी कट रचत होती. 

20 हजारांचा फोन घेऊन प्रियकरासह पळाली 

नवरा-बायकोच्या या कथेत खलनायक बायकोचा प्रियकर निघाला. तो बऱ्याच दिवसांपासून प्रेयसीसोबत पळून जाण्याचा प्लान आखत होता. तो चांगल्या संधीच्या शोधत होता. पण प्रेयसीकडे मोबाईल नसल्यामुळे त्याची चाल यशस्वी होत नव्हती. दरम्यान, आठवडाभरापूर्वी पीडित पती घरी आला असता त्याने पत्नीला 20 हजार रुपये किमतीचा स्मार्ट फोन भेट दिला. त्यानंतर तो नेपाळला परतला.

मागे वळून पाहतो तर त्याची पत्नी प्रियकरासह पळून गेली होती. धक्कादायक म्हणजे ही महिला तीन मुलांची आई आहे. नेपाळला पोहोचल्यानंतर काही दिवसांनी पतीने फोन केला तेव्हा पत्नीचा मोबाईल बंद होऊ लागला. यामुळे पती चांगलाच घाबरला. पत्नीचा कोणताही मागमूस न सापडल्याने पतीने पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला. 

शेजाऱ्याने फोन केल्यावर रडू आवरेना

पत्नी फोन उचलेाना म्हणून त्याने शेजाऱ्यांना फोन केला. यावेळी त्याची बायको गावातील एका मुलासोबत पळून गेल्याचे समजले. हे ऐकताच त्याच्या पायाखालची जमिनच सरकली. त्यानंतर निराश झालेला पती घरी परतला. अमरपूर पोलीस ठाण्यात त्याने याबद्दल माहिती दिली. 

याप्रकरणी पत्नीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती अमरपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी विनोद कुमार यांनी दिली. महिला सतत फोनवर बोलायची, यावरून दोघांमध्ये अनेकदा भांडण होत असे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.