सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी

शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली.

Updated: Dec 24, 2020, 01:09 PM IST
सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे मागे घ्यावे - राहुल गांधी
Pic Courtesy: ANI

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी  (Narendra Modi) हे देशाला एका धोकादायक वळणावर घेऊन गेले आहेत. देशात लोकशाही नाही, देश काही उद्योगपतींच्या हाती देण्याचा घाट पंतप्रधान मोदी यांनी घातला आहे अशी टीका काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) यांनी केली. शेतकरी आंदोलन (farmers protest) सुरु आहे. सरकारने विशेष अधिवेशन घेऊन कृषी कायदे (New agricultural laws) तातडीने मागे घ्यावे, अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली. राष्ट्रपतींना भेटल्यानंतर राहुल गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप केले.

दरम्यान, राहुल गांधी यांच्या पायी मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. कलम १४४ लागू असल्याने परवानगी नाकारली गेली. राष्ट्रपती भवनापर्यंत राहुल गांधी पायी मोर्चा काढणार होते. आज ते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. भेटीदरम्यान ते राष्ट्रपतींना नव्या कृषीकायदांविरोधातले निवेदन सोपविले. ते विजय चौक इथून पायी राष्ट्रपती भवनापर्यंत जाणार होते. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही काँग्रेसचे नेते कार्यकर्ते विजय चौक दाखल झालेत. त्यानंतर राष्ट्रपतींना भेटण्यासाठी फक्त तीन जणांचे शिष्टमंडळ गेले.  मात्र या भेटीआधी काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यालयात बैठक झाली.

नवे कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी मध्यस्थी करण्याची मागणी करत काँग्रेस नेत्यांनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेण्याआधी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आंदोलन करत होते. दरम्यान, त्याआधी पोलिसांनी काँग्रेसचा मोर्चा रोखत प्रियंका गांधी ( Priyanka Gandhi) आणि इतर नेत्यांना ताब्यात घेत कारवाई केली. नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन अद्यापही सुरु आहे. काँग्रेसनेही या मुद्द्यावरुन मोदी सरकारला घेरण्याची तयारी सुरु केली आहे.