वडील- भाऊ आणि नातेवाईकांनीच केला महिलेवर गँगरेप

एका महिलेवर तिच्या वडील - भाऊ आणि तिच्या कुटुंबातील चार सदस्यांनी सामूहिक बलात्कार केला. कारण 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Nov 28, 2017, 04:27 PM IST
वडील- भाऊ आणि नातेवाईकांनीच केला महिलेवर गँगरेप  title=

मुजफ्फरनगर : एका महिलेवर तिच्या वडील - भाऊ आणि तिच्या कुटुंबातील चार सदस्यांनी सामूहिक बलात्कार केला. कारण 

ती महिला आपलं घर सोडून प्रियकरासोबत गेली होती. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपींना ताब्यात घेतलं आहे. पीडित महिला काही महिन्यांपूर्वी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली होती. धनेडा गावातील ही घटना असून पीडित महिलेवर वडील आणि भावानेच बलात्कार केल्यामुळे सगळीकडे चर्चा होत आहे. पोलीस अधिकारी कुशल पाल सिंह यांनी सांगितले की, या सर्व आरोपींच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. 

पीडित महिलेने तक्रार केली आहे की, पीडित महिलेच्या कुटुंबातील सदस्यांना बलात्कार केल्यानंतर तिला धमकावलं आहे. तसेच आरोपींनी पीडित महिलेला एका बंद खोलीत देखील कैद करून ठेवलं होतं. या प्रकाराने सर्वत्र निषेध वर्तवला जात आहे. 

आज ही महिला असुरक्षित 

या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिला आता आपल्या कुटुंबात देखील सुरक्षित नसल्याचं समोर आलं आहे. प्रेम विवाह केल्यामुळे कुटुंबियांनी तिच्याशी केलेली ही घटना खरंच धक्कादायक आहे. आजही समाजात प्रेमविवाहाला होणारा कडाडून विरोध हा महिलांचा घात करेल यात शंका नाही.