World Richest : हिंडेनबर्ग अहवालामुळे Gautam Adani यांना मोठा धक्का; इतकी संपत्ती गमावली की....

Top 10 Billionaires List : गेल्या अनेक काळापासून टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत सहभागी झालेले गौतम अदानी आता यामधून बाहेर पडले आहेत. अमेरिकास्थित रिसर्च कंपनी हिंडेनबर्गचा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर अदानी समूहाच्या सर्व कंपन्याचे शेअर्स कोसळले. गौतम अदानी यांची संपत्तीही कमी झाली आहे,   

Updated: Jan 31, 2023, 12:07 PM IST
World Richest : हिंडेनबर्ग अहवालामुळे Gautam Adani यांना मोठा धक्का; इतकी संपत्ती गमावली की....

Top 10 Billionaires: जगातील टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीत मोठा बदल झाला आहे. गेल्या अनेक काळापासून या यादीत सहभागी असणारे भारतीय उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) आणि मुकेश अंबानी (Mukesh Ambani) या यादीतून बाहेर पडले आहेत. 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेतील रिसर्च कंपनी हिंडेनबर्गने (Hindenburg Report) अदानींसंबंधी अहवाल प्रसिद्ध केल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे शेअर्स (Adani Group Shares) कोसळल्याचं पहायाला मिळालं. हिंडेनबर्गने अदानी समूहावर लबाडी आणि अनियमिततांचा आरोप केला आहे. दरम्यान याचा परिणाम गौतम अदानी यांच्या संपत्तीवर झाला असून फक्त आठवडाभरात ते श्रीमंतांच्या यादीतून बाहेर पडले आहेत. 

अदानींकडे आता किती संपत्ती?

हिंडेनबर्गचा रिपोर्ट आल्यानंतर गौतम अदानी यांच्या संपत्तीत आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हा रिपोर्ट प्रसिद्ध होऊन फक्त आठवडाच झाला आहे आणि ब्लमूबर्ग बिलेनिअर्स इंडेक्सनुसार (Bollmberg Billionaires Index) गौतम अदानी यांची एकूण संपत्ती कमी होईल 84.4 अरब डॉलर इतकी झाली आहे. यासह गौतम अदानी अब्जाधीशांच्या यादीत 11 व्या क्रमांकावर घसरले आहेत. 

अदानींच्या कंपनींचे MCap घसरले

हिंडेनबर्गचा अहवाल आल्यानंतर अदानी समूहाच्या Stock Market मध्ये लिस्टेड असणाऱ्या सातही कंपन्यांचे शेअर्स घसरले आहेत. यामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांचं एकूण मार्केट कॅप फक्त तीन दिवसांत 5.5 लाख कोटींनी कमी झालं आहे. Adani Total Gas आणि Adani Green Energy च्या शेअर्समध्ये गेल्या चार दिवसांत सर्वात मोठी घसरण झाली असून 20 टक्क्यांनी पडले आहेत. याशिवाय शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या Adani Ports पासून Adani Wilmar पर्यंत सर्वाचे शेअर घसरले आहेत. 

मुकेश अंबानी 12 व्या स्थानी घसरले

Bloomberg Billionaires Index च्या ताज्या आकडेवारीनुसार, रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी जगातील श्रीमंतांच्या यादीत 12 व्या स्थानी घसरले आहेत. त्यांची एकूण संपत्ती 82.2 अरब डॉलर आहे. दोन्ही भारतीय उद्योजकांच्या संपत्तीत आता फारसं अंतर राहिलेलं नाही.  गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत फक्त 2.2 अरब डॉलर्सचा फरक आहे. गतवर्षी 2022 मध्ये गौतम अदानी जगातील श्रीमंतांच्या तुलनेत सर्वाधिक कमाई करणारे ठरले होते. 

अदानींनी सर्वाधिक संपत्ती गमावली

एकीकडे गतवर्षी 2022 मध्ये गौतम अदानी सर्वाधिक कमाई केल्याने चर्चेत होते. मात्र यावर्षी पहिल्याच महिन्यात सर्वाधिक संपत्ती गमावणाऱ्यांच्या यादीत गौतम अदानी टॉपला आले आहेत. महिन्याभरात त्यांनी 36.1 अरब डॉलर संपत्ती गमावली आहे.