नोटबंदी, जीएसटीनंतर जीडीपीच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा

नोटबंदी आणि जीएसटीनंतर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 30, 2017, 06:55 PM IST
नोटबंदी, जीएसटीनंतर जीडीपीच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा title=

नवी दिल्ली : नोटबंदी आणि जीएसटीनंतर अर्थव्यवस्थेच्या बाबतीत मोदी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 

जीडीपी दर वाढला

या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीच्या जीडीपीमध्ये मोठी वाढ पाहायला मिळाली आहे. जीडीपी दर 5.7 वरुन 6.3 टक्के झाला आहे. भारतीय अर्थव्यवस्था नोटबंदी आणि जीएसटीमुळे ढासळते की काय अशी भीती होती पण असं घडलं नाही. आर्थिक वर्ष (2017-18) च्या दुसऱ्या तिमाहीमध्ये देशाची अर्थव्यवस्था वाढतांना दिसत आहे.

३ वर्षातली सर्वात कमजोर ग्रोथ रेट 

सप्टेंबरच्या तिमाहीमध्ये देशाचा जीडीपी 6.3 टक्के होता. तर पहिल्या तिमाहीमध्ये तो 5.7 टक्के होता. जी मागच्या तीन वर्षातली सर्वात कमजोर ग्रोथ रेट आहे.

मोदी सरकारला दिलासा

केंद्र सरकारने जारी केलेल्या आकड्यांनुसार या आर्थिक वर्षात दुसऱ्या तिमाही मध्ये जीडीपी 31.66 लाख कोटी असण्याचा अनुमान आहे. तर मागच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये जीडीपी 29.79 लाख कोटी होती.