Viral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक!

Viral Video : नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती.

Updated: Dec 16, 2022, 06:30 PM IST
Viral Video : हळदीचा समारंभ चालू असताना असं नेमकं काय घडलं? घराला लागलं सुतक! title=

Viral Video : देशभरात लग्न सोहळ्याच वातावरण आहे. अनेक ठिकाणी ढोल-नगाडे वाजतायत. या लग्न सोहळ्यादरम्यान काही विचित्र घटना घडल्याचेही समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत ज्या घरातून नवरीच्या लग्नाची वरात निघणार होती, त्या घरातून पार्थिव बाहेर काढाव लागल्याची दुदैवी घटना घडलीय. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. 

नवरीच्या घरात लग्नाची लगबग सुरु होती. दुरदुर वरून नातेवाईक घरी राहायला आले होते. लग्न (marriage) अंतिम टप्प्यात पोहोचले होते. लग्नाचा आदल्या दिवशी नवरीला हळदीचा कार्यक्रम होता.नवरीच्या कुटूंबियांनी या हळदीसाठी मोठी तयारी केली होती. संपुर्ण कुटूंब आनंदात होते. मुलीचा हळदी सोहळा आनंदाने साजरा होत होता. नातेवाईत नाचत होते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच नाचत होते. यावेळी एका आजीला नाचताना अचानक हार्ट अटॅक (Heart Attack) आला. आणि ती नाचता नाचता जमीनीवर कोसळली. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. 

व्हिडिओत काय?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, स्टेजवर काही वृद्ध महिला (edged women Dance) नाचत आहेत. काही मिनिटे नाचून झाल्यावर त्या स्टेजवरून खाली उतरतात. या दरम्यान एक आजी अचानक स्टेजवरच कोसळते. या आजीला नाचता नाचता हृदयविकाराचा झटका आला होता आणि आणि खाली पडून तिचा मृत्यू झाला. ही संपुर्ण घटना कॅमेरात कैद झाली आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

संपुर्ण घटनाक्रम

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) सिवनी जिल्ह्यातील बंदोल पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बाखरी गावातील साहू कुटुंबात ही दुखद घटना घडलीय. गावातील साहू कुटुंबातील मुलीचे छिंदवाडा जिल्ह्यातील एका कुटुंबात 15 डिसेंबरला लग्न होणार होते. लग्नाच्या आधी हळदी समारंभासह संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नवरीच्य़ा आजोबांच्या चार बहिणी (आजी) एकत्रितपणे नाचत होत्या. या दरम्यान डान्स संपल्यानंतर भीमगढ येथील आजी शोदा साहू नाचत असताना जमिनीवर कोसळल्या. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

दरम्यान या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. तसेच कुटुंबियांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.