जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला, ७ जवान जखमी

जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले असून सात जवान जखमी झालेत. पोलीस पार्टीवर दहशवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. 

Updated: Sep 21, 2017, 01:12 PM IST
जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला, ७ जवान जखमी

जम्मू : जम्मू-काश्मीरच्या त्रालमध्ये दहशतवादी हल्ला झालाय. या हल्ल्यात दोन नागरिक ठार झाले असून सात जवान जखमी झालेत. पोलीस पार्टीवर दहशवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. 

एएनआयच्या माहितीनुसार, पुलवामा जिल्ह्यातील त्राल येथील बस स्टँडजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेडच्या सहाय्याने हल्ला केला. यावेळी त्यांनी गोळीबारही केला.

या हल्ल्यात सीआरपीएफचे सात जवान जखमी झाल्याचे समजतेय. हल्ल्यानंतर संपूर्ण परिसराला घेराव घालण्यात आला असून सर्च ऑपरेशन सुरु कऱण्यात आलंय.