श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून कुरापती सुरूच आहेत. रविवारी सकाळी पुन्हा पाकिस्तानी सेनेकडून पुंछ जिल्ह्यातील केजी सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. परंतु भारतीय सेनेकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यात आले. रविवारी सकाळी पाकिस्तानकडून पुंछ जिल्ह्यात गोळीबार सुरू करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारानंतर भारतीय सेनेकडूनही तात्काळ कारवाई करण्यात आली.
पाकिस्तानकडून अखनूरमधील केरी बट्टल भागातही गोळीबार करण्यात आला. तसेच पाकिस्तानने राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी सेक्टरमध्येही शस्त्रसंधीचे उल्लंघन केले.
J&K: Pakistan violated ceasefire in Sunderbani sector of Rajouri district today at about 1800 hours. Indian Army is retaliating effectively. More details awaited.
— ANI (@ANI) March 9, 2019
Jammu & Kashmir: Pakistan violates ceasefire in Keri Battal area of Akhnoor. Indian Army is retaliating strongly. More details awaited. pic.twitter.com/N24ouYnR2E
— ANI (@ANI) March 9, 2019
१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या जम्मू-काश्मीरमधील पुलवामात झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून गोळीबार तसेच शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच आहे.