मंगलकार्यालयात ब्रायफ्रेन्डचं लग्न सुरु, बाहेर गर्लफ्रेन्ड आक्रोश करतेय, अशी वेळ कुणावर येऊ नये

तीन वर्ष एकत्र राहून देखील तिच्या बॉयफ्रेंडने न सांगता गपचुप लग्न करण्याचं ठरवलं आणि तो लग्नमंडपात

Updated: Jul 11, 2021, 05:33 PM IST
मंगलकार्यालयात ब्रायफ्रेन्डचं लग्न सुरु, बाहेर गर्लफ्रेन्ड आक्रोश करतेय, अशी वेळ कुणावर येऊ नये title=

मुंबई : सोशल मीडियावर एका तरुणीचा बॉयफ्रेंडच्या लग्नामंडपात जाऊन राडा करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय. लग्नामंडपाच्या गेटवर बाबू-शोना करुन ही  तरुणी आपल्या बॉयफ्रेंडला बोलवण्याचा प्रयत्न करते आहे. जोर-जोरात गेट वाजून ती आपल्या प्रियकराला हाक मारताना दिसतेय. या तरुणीचा हा ड्रामा अर्धा तास सुरु  होता, पण उपस्थित असलेली मंडळी तिला लग्नमंडपात जाण्यापासून थांबवताना दिसली.

लग्न थांबवण्याचे सगळे प्रयत्न ही तरुणी करत होती.पण कोणीही तिला साथ देत नाहीये. ना कोणी तिला विचारलं देखील नाही. त्यात ती गेटमधून आत जाण्यासाठी  जमेल तितके प्रयत्न करत होती. पण तिथे उभ्या असलेल्या सेक्युरिटी गार्डने देखील या तरुणीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

हा व्हायरल व्हिडिओ मध्यप्रदेशमधील होशंगाबाद येथील आहे. हे कपल तीन वर्ष लिवईन रिलेशनशीपमध्ये होते. दोघेही भोपालच्या एका कंपनीमध्ये काम करत होते.  तीन वर्ष एकत्र राहून देखील तिच्या बॉयफ्रेंडने न सांगता गपचुप लग्न करण्याचं ठरवलं आणि तो लग्नमंडपात वधुच्या पेहरावात उभा राहिला.ही तरुणी मूळची  कानपूरमध्ये राहणारी आहे. 

यावेळी हा ड्रामा सुरु असताना घटनास्थळी महिला पोलिस अधिकारी पोहोचल्या, आणि त्यांनी तरुणीला गाडीत बसवून पोलिस स्टेशनला नेलं आणि घडलेला प्रकार  जाणून घेतला. त्यानंतर तक्रार दाखल करण्याबाबत तरुणीला विचारण्यात आलं , मात्र तिने तक्रार दाखल करण्यास नकार दिला आणि ही तरुणी भोपाल येथे घरी  परतली. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच चर्चेत आहे.या व्हिडिओवर कमेंट करत यावर अनेकांनी आपली प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे.