तुमच्या फ्रीज-भिंतीमध्ये अंतर नाही? भरमसाठ वीजबीलपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाहा किती असावं अंतर

Fridge to Wall Distance:  आपल्याला जर का जास्त विजेचे बिल येत असेल तर त्यात चुक तुमचीच आहे. कारण याचा परिणाम हा थेट तुमच्या फ्रीजशी आहे. जर का फ्रीज आणि भिंतीमध्ये अंतर नसेल तर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जास्तीच बिल येऊ शकते. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 9, 2023, 02:35 PM IST
तुमच्या फ्रीज-भिंतीमध्ये अंतर नाही? भरमसाठ वीजबीलपासून मुक्ती मिळवण्यासाठी पाहा किती असावं अंतर title=
how much distance should be there in Fridge and Wall

Fridge to Wall Distance:  आपल्या सर्वांच्याच घरी फ्रीज असतो, परंतु त्याची दिशा मात्र अनेकदा चुकलेली असते. त्यामुळे आपल्याला भरमसाठ विजेचे बिल हे भरावे लागते. त्यामुळे अशावेळी काय करावे हे कोणालाच कळत नाही. दर महिन्याला जर का तुम्हाला फार जास्तीचे बिल येत असेल तर तुमची चूक ही फ्रिज आणि भिंतीमधील अंतराची आहे. त्यामुळे यावेळी तुम्हाला या गोष्टीबद्दल नीट जाणून घेणे हे आवश्यक आहे. आपण जेव्हा फ्रीज भिंतीला लावतो तेव्हा त्या फ्रीजचा प्लग हा वर लावलेला असतो. तेव्हा आपला फ्रीज हा भिंतीपासून किती लांब ठेवावा? या लेखातून आपण यामागील नक्की शास्त्र काय आहे ते जाणून घेणार आहोत. अनेकदा काय होतं की लोकं हे फ्रिज हा अनेकदा भिंतीला चटकवून ठेवतात. ज्याचा आपल्याला जास्त तोटा होतो. तेव्हा अशावेळी आपल्याला जाणून घ्यायचे आहे ते म्हणजे नक्की यामागे कारण काय आहे. तुम्ही जर का तुमचा फ्रीज हा भिंतीला टेकून ठेवत असाल तर तुम्ही फार मोठी चूक करत आहेत. 

तुम्हाला माहितीये का की, जर तुम्ही तुमचा फ्रीज हा आपल्या भिंतीपासून जवळ ठेवला असेल तर त्याचा परिणाम म्हणून हे वीज बिल जास्त येण्याची शक्यता आहे. तुम्हाला वाटेल की हे कसं का शक्य आहे परंतु याच्या परिणामामुळे खरंच तुमचे वीज बील जास्त येऊ शकते. 

असं म्हटलं जातं की जास्त जास्तही नाही आणि कमीत कमीही नाही. फ्रीज आणि भिंतीमधील अंतर हे मध्यम असावं. आता येथे प्रश्न असतो ते म्हणजे जागेचा. जर का जास्त जागा असेल तर आपल्या प्रमाणपद्धतीनं आपण फ्रीज आणि भिंतीमधील अंतर हे योग्य ठेऊ शकतो. 

हेही वाचा : The Vaccine War मध्ये दिसणार नाना पाटेकर! पहिलं पोस्टर पाहून चाहते इम्प्रेस; प्रतिक्रिया फारच बोलक्या

फ्रिज आणि भिंतीमध्ये किती अंतर असावं? 

- तुम्ही फ्रीज नवीन घेतला असेल तर दुकानदारही तो तुम्हाला फार जवळ ठेवू नका असंच सांगतात. 
- काही लोकं हे जागेच्या अभावी फ्रीज भिंतीला चिटकवून ठेवतात. परंतु त्यानं विजबिल जास्त येते. 
- तज्ञांच्या मते, फ्रीज हा भिंतीपासून 6-10 इंच दूर असावा. 
- याचे महत्त्वाचे कारण म्हणजे फ्रीजच्या मागच्या बाजूतून ग्रीलमधून गरम हवा बाहेर फेकली जाते. 
- त्यातून ही गरम हवा थंड व्हायला फार वेळ लागते. त्यामुळे याचा परिणाम म्हणून विज बील जास्त येते. 
- फ्रिजच्या जवळ कधीच इलेक्ट्रिकल वस्तू ठेवू नये. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)