Indian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा!

How To Check PNR Status: पीएनआर नंबरची स्थिती ऑनलाइन कशी तपासायची हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तुम्हालाही तुमच्या तिकीटाचं (Ticket) काय झालं? हे पहायचं असेल तर तुम्ही ही सोप्पी आणि जलद पद्धत वापरू शकता.

Updated: Feb 25, 2023, 04:12 PM IST
Indian Railways: तुमच्या ट्रेन तिकिटाचं PNR स्टेटस चेक करायचंय? ही ट्रिक लक्षातच ठेवा! title=
PNR Status Check

How To Check PNR Status: आजकाल सगळं ऑनलाईन झालंय. शॉपिंग असो किंवा सिनेमाची तिकीटं, सगळं काही ऑनलाईन होऊन जातं. एवढंच काय तर ट्रेनची तिकीटं (Train Ticket) देखील ऑनलाईन घरबसल्या काढल्या जाऊ शकतात. त्यासाठी लांबच्या लांब लाईनमध्ये थांबण्याची गरज नाही.

PNR नंबर म्हणजे काय?

PNR हा एक युनिक क्रमांक आहे, जो प्रत्येक बुक केलेल्या रेल्वे तिकिटावर पहायला मिळतो. पीएनआर (PNR Number Status) नंबरद्वारे तुम्ही तुमचे तिकीट कन्फर्म झालं आहे की नाही हे जाणून घेऊ शकता. तसेच जर तुम्ही RAC असेल तर तुम्ही तुमच्या तिकिटाची (Ticket Confirm) सद्यस्थिती तपासू शकता.

असा चेक करा PNR नंबरचं स्टेटस  (PNR Number Status)

1. अनेक वेबसाईट्स किंवा अॅपवरून तुमच्‍या पीएनआर नंबरची स्‍थिती कळू शकते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइट indianrail.gov.in ला भेट देऊन तुमचा PNR नंबर कसा तपासू शकता.

2. वेबसाइटवर आल्यानंतर सर्वात वर दिसणार्‍या 'PNR Enquiry' पर्यायावर क्लिक करा. टॅप केल्यानंतर, एक नवीन वेबपेज समोर येईल.

3. नवीन पानावर 'Enter PNR Number' हा पर्याय दिसेल. तुमचा पीएनआर नंबर इथे टाका. पीएनआर नंबर टाकल्यानंतर तुम्ही एका नवीन पेजवर तुमच्या पीएनआर नंबरचे सर्व डिटेल्स पहायला मिळतील.

आणखी वाचा - काय आहे Tatkal Passport Service; कसा कराल अर्ज, इथं जाणून घ्या संपूर्ण पद्धत

तात्काळ तिकीटासाठी नवं अॅप

रेल्वेने तत्काल तिकिटांसाठी नवीन ऍप लॉंच केले आहे. हे ऍप आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. या ऍपच्या माध्यमातून घरबसल्या काही सेकंदात तुम्ही तिकिट बुक करू शकता. Rail Connect app असं या अॅपचं नाव आहे.

होळी निमित्त स्पेशल ट्रेन (Holi Special Train)

होळी (Holi 2023) सणाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने होळी विशेष गाड्या धावणार आहेत. यामध्ये गोव्यातील करमाळी रेल्वे स्थानक ते गुजरातमधील सुरत स्थानकापर्यंत या गाड्या असतील.

1. ट्रेन क्रमांक - 09193 - करमाळी सुपरफास्ट स्पेशल (Karmali Superfast Special)  सुरत, गुजरात येथून 7 मार्चला संध्याकाळी 7.50 वाजता सुटेल.

2.गाडी क्रमांक - 09194 - करमाळी-सुरत विशेष गाडी  (Karmali Surat Express)  8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 4.20 वाजता करमाळीहून सुटेल.

 WhatsApp वर मिळवा PNR स्टेटस

तुम्हाला WhatsApp वर PNR स्टेटस मिळू शकेल. रेल्वे प्रवाशांना आता व्हॉट्सॲपवर रिअल-टाईम पीएनआर स्टेटस तसेच अन्य प्रवासाशी संबंधित माहिती मिळू शकेल. माहितीनुसार, आपल्याला आपल्या मोबाइलवर एक नंबर (9881193322) फीड करावा लागेल. यानंतर, आपल्याला या क्रमांकावर आपला पीएनआर नंबर पाठवावा लागेल. यानंतर, पडताळणीसाठी विचारलेली माहिती भरा. असं केल्यावर तुम्हाला वेळोवेळी व्हॉट्सॲपवर (WhatsApp) तुमच्या प्रवासाशी संबंधित सर्व अपडेट्स मिळतील.