करदात्यांना मिळणार २४ तासांच्या आत आयकर परतावा

इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी. आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे. 

Updated: Feb 5, 2019, 06:42 PM IST
करदात्यांना मिळणार २४ तासांच्या आत आयकर परतावा title=

मुंबई : इन्कम टॅक्स भरणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी.  इन्कम टॅक्स अर्थात कर. या करदात्यांना आता २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळणार आहे. त्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. करदात्यांना २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळण्यास मदत होणार आहे. आगामी दोन वर्षांत महसूल विभाग एक विशिष्ट यंत्रणा विकसित करणार आहे. यामाध्यामातून करदात्यांना त्यांचे पैसे परत मिळणास मदत होणार आहे. 

आता परतावा यंत्रणा नेहमीपेक्षा चांगली बनविली जात आहे, जेणेकरुन लोकांना २४ तासांच्या आत परतावा मिळेल. त्यामुळे होणारा विलंब टळणार आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. यास दोन वर्ष लागतील. मागील महिन्यातल केंद्र सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) च्या माहिती तंत्रज्ञान सोयीसुविधेच्या अद्ययावतीकरणासाठी ४,२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे अद्ययावतीकरण परतावे, छाननी, पडताळणी आदींसाठी केले जाणार आहे, असे महसूल सचिव अजय भूषण पांडे म्हणालेत.

सध्या परतावा मिळण्यासाठीचे काम स्वयंचलित ऑनलाइन यंत्रणेने होते. यावर्षी दीड लाख कोटी रुपयांचा रिफंड थेट करदात्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आला होता. सध्या रिफंड काम ऑनलाइन केले गेले आहे. यावर्षी दीड लाख कोटी रुपयांचे परतावे थेट बँक खात्यांना पाठवले गेले. आता याच प्रक्रियेचे नुतनीकरण केले जात आहे, जेणेकरून करदात्यांना २४ तासांच्या आत कर परतावा मिळेल, अशी माहिती महसूल सचिव अजय भूषण पांडे यांनी दिली. ही प्रक्रिया सुरू असून येत्या दोन वर्षांत सुरु होईल, असेही पांडे म्हणाले. 

२०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की आयकर विभागाचा परतावा, रिफंड, ग्राहक तक्रारी आदी सर्व कामे आता ऑनलाइन होत आहेत.  सरकार प्रत्यक्ष कर गेल्या महिन्यात सेंट्रल बोर्ड (सीबीडीटी) माहिती तंत्रज्ञान पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी चार हजार दोनशे कोटी रुपये मंजूर केले आहेत.