नवी दिल्ली : भारत व्यापार, सरकार, एनजीओ आणि मीडिया याबाबतीत जगातील सर्वात विश्वासु देशांच्या यादीत भारताने स्थान मिळवलं आहे. पण देशातील वस्तूंच्या ब्रँडवर भारत मागे पडला आहे. एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे. एडलमॅनच्या ट्रस्ट बॅरोमीटर-2019 च्या रिपोर्टमध्ये वैश्विक आर्थिक मंचावर संमेलन सुरु होण्यासाठी हे यादी जाहीर करण्यात आली. या यादीत भारत 3 अकांनी वर पोहोचला आहे. सर्वाधिक विश्वासु देशांच्या यादीत भारत 52 व्या स्थानी पोहोचला आहे.
देशातील जागरुक जनतेच्या यादीत भारताने दुसरं स्था मिळवलं आहे. तर याच यादीत चीन 79 स्थानावर आहे. सामान्य लोकसंख्याच्या यादीत भारत तिसऱ्य़ा स्थानावर आहे. तर चीन या यादीत 77 व्या स्थानावर आहे. ही यादी एनजीओ, व्यापार, सरकार आणि मीडिया यावर तयार करण्यात आली आहे. 27 आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारात करण्यात आलेल्या ऑनलाईन सर्वेक्षणावर हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. यामध्ये 33,000 हून अधिक लोकांनी सहभाग नोंदवला होता.
ब्रँडच्या विश्वासनीयतेच्या बाबतीत स्विट्जरलँड, जर्मनी आणि कॅनडा हे टॉपवर आहेत. यानंतर जपानचा नंबर लागतो. भारत, मेक्सिको आणि ब्राझीलमध्ये कंपन्यांवर लोकांचा विश्वास कमी असल्याचं समोर आलं आहे. यानंतर चीन आणि दक्षिण कोरियाचा देखील नंबर लागतो.