नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. आज कोरोना रुग्णांची संख्या ६२ लाखांवर पोहोचली असून गेल्या २४ तासांमध्ये ८० हजार ४७२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर १ हजार १७९ जणांनी आपले प्राण गमावले आहेत. देशात ६२ लाख २५ हजार ७६४ जण कोरोना बाधित झाले आहेत. देशात कोरोना बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत असताना देखील दिलासा देणारी बाब म्हणजे देशातील कोरोना या धोकादायक विषाणूवर मात करणाऱ्यांची संख्या अधिक आहे.
India's #COVID19 tally crosses 62-lakh mark with a spike of 80,472 new cases & 1,179 deaths reported in last 24 hours.
Total case tally stands at 62,25,764 including 9,40,441 active cases, 51,87,826 cured/discharged/migrated & 97,497 deaths: Ministry of Health & Family Welfare pic.twitter.com/UA8LPNijNg
— ANI (@ANI) September 30, 2020
सध्या देशात ९ लाख ४० हजार ४९७ रुग्ण उपचार घेत आहेत . त्याचप्रमाणे ५१ लाख ८७ हजार ८२६ रुग्णांनी या धोकादायक विषाणूवर मात केली आहे. आतापर्यंत देशात कोरोना व्हायरसमुळे ९७ हजार ४९७ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
A total of 7,41,96,729 samples tested for #COVID19, up to 29th September. Of these, 10,86,688 samples were tested yesterday: Indian Council of Medical Research (ICMR) pic.twitter.com/M9OGx2CUNj
— ANI (@ANI) September 30, 2020
देशात आतापर्यंत ७,४१,९६,७२९ कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत, तर मंगळवारी १० लाख ८६ हजार ६८८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशात येत्या १ ऑक्टोबरपासून अनलॉक ५ची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.