Job For 10th Pass: दहावी उत्तीर्णांनो, तुमच्याकडे चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्ज

ITBP Recruitment 2024: इंडिया-तिबेट पोलीस कॉंस्टेबल भरती 2024 साठी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करु शकता. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 26, 2024, 07:44 AM IST
Job For 10th Pass: दहावी उत्तीर्णांनो, तुमच्याकडे चांगल्या पगाराच्या सरकारी नोकरीची संधी; 'येथे' पाठवा अर्ज title=
ITBP Recruitment 2024

ITBP Recruitment 2024: शिक्षण कमी झालं असेल म्हणजे अगदीच दहावी उत्तीर्ण असू तर आपल्याला कोणी नोकरी देणार नाही, असे अनेकांना वाटते. त्यामुळे ते नोकरीकडून फार अपेक्षा न ठेवता मिळेल ती नोकरी करतात. पण आता अशा उमेदवारांना काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्हाला चांगल्या पद आणि पगाराची सरकारी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. भारत-तिबेट सीमा पोलिसात बंपर भरती निघाली आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख,पगार याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

इंडिया-तिबेट पोलीस कॉंस्टेबल भरती 2024 साठी तुम्ही ऑनलाईन माध्यमातून अर्ज करु शकता. यासाठी 28 जुलै 2024 रोजी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. या पदभरती अंतर्गत एकूण 143 कॉन्स्टेबलची रिक्त पदे भरली जाणार आहेत. याचा तपशील जाणून घेऊया. 

आयटीबीपीमध्ये स्वच्छता कर्मचारी, मोची आणि न्हावी या रिक्त पदांच्या भरतीसाठी नोटिफिकेशन काढण्यात आले आहे. यात स्वच्छता कर्मचाऱ्याची एकण 101 पदे, कॉन्स्टेबल (न्हावी)ची एकूण 5 पदे आणि कॉन्स्टेबल (माळी) ची एकूण 37 रिक्त पदे भरली जणार आहेत. स्वच्छता कर्मचारी आणि न्हावी या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे इतके असणे आवश्यक आहे.कॉन्स्टेबल माळी पदासाठी वयोमर्यादा 18 ते 23 वर्षे इतकी आहे.  कोणत्याही मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून तुम्ही किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.3 चाचण्यांच्या माध्यमातून तुमची या रिक्त पदांसाठी निवड केली जाणार आहे.यामध्ये शारिरीक परीक्षा, लेखी परीक्षा आणि ट्रेड टेस्टचा समावेश असेल. यासोबतच उमेदवारांकडे संबंधित ट्रेडमधील आयटीआय प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराने संबंधित ट्रेडमधील आयटीआयमधून 2 वर्षांचा डिप्लोमा करणे आवश्यक आहे. 

अर्जाची शेवटची तारीख

26 ऑगस्ट 2024 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. अर्ज करण्यापुर्वी उमेदवाराने नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे, त्यानंतरच अर्ज भरावा. अर्जात काही त्रुटी आढळल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर अर्ज आल्यास तो बाद करण्यात येईल, याची नोंद घ्या.

अधिकृत वेबसाइटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

मुंबई विद्यापीठात नोकरी 

मुंबई विद्यापीठात विविध 152 अनुदानित शिक्षकीय पदावर भरतीसाठी जाहिरात प्रसिद्धी करण्यात आली आहे. यामध्ये विविध विद्याशाखेच्या अधिष्ठाता पदांसाठी 4 जागा, प्राध्यापक पदांसाठी 21 जागा, सहयोगी प्राध्यापक/ उप ग्रंथपाल पदांसाठी 54 जागा आणि सहाय्यक प्राध्यापक/ सहाय्यक ग्रंथपाल पदांसाठी 73 पदांचा समावेश आहे. ही सर्व पदे अनुदानित तत्वावर भरण्यात येतील याची उमेदवारांनी नोंद घ्या.इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी https://muappointment.mu.ac.in/ या लिंकवर अर्ज सादर करावे. राखीव पदांचा तपशील, पात्रता, अनुभव आणि इतर नियम व अटी इत्यादी बाबतची सविस्तर माहिती मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/ या संकेतस्थळावर Career या लिंकवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी या भरतीसंदर्भात माहिती दिली आहे. विविध विद्याशाखांच्या अधिष्ठाता या पदांसाठी पुनश्च जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत असून यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरात क्रमांक क्र. एएक्युए/आयसीडी/2023-24/853, दिनांक 22 सप्टेंबर 2023 नुसार सदर पदांकरीता ज्या अर्जदारांनी अर्ज सादर केलेले आहेत अशा अर्जदारांनी नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. उमेदवारांनी आपले अर्ज 7 ऑगस्ट 2024 सायंकाळी 5 वाजण्याच्या आत पाठवायचे आहेत.