Kitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !

चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.(kitchen tips),हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.

Updated: Dec 2, 2022, 10:25 AM IST
Kitchen Tips: स्वयंपाक करताना वापरा 'या' स्मार्ट टिप्स; सगळे करतील तुमची वाहव्वा !

Kitchen Tips:  स्वयंपाक (cooking) करताना बऱ्याचदा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या वापरून स्मार्ट कुकिंग  (smart cooking) करू शकतो, प्रत्येक पदार्थ करताना काही टिप्स ज्या वापरून आपण उत्तम स्वयंपाक करू शकतो. चला तर मग जाणून घेऊया अशाच काही खास टिप्स.  (Kitchen Tips know this cooking tips make food delecious mess free smart kitchen hacks)

टोमॅटो प्युरी (tomato puree) प्रत्येक जेवणासाठी वापरतात पण तुम्हाला टोमॅटोचा पल्प (tomato pulp) काढण्याची एक सोपी पद्धत माहित आहे का नसेल माहित तर हे घ्या... 

1- टोमॅटो पल्प काढण्यासाठी सर्वात आधी कूकरमध्ये पाणी घेऊन त्यात मीठ घालावे आणि मग टोमॅटो शिजवून घ्या, अश्याने टोमॅटोची साल पटकन निघते आणि त्या टोमॅटोचा वापर  सूप ,भाजीसाठीची ग्रेव्ही, ज्यूससाठी करता येतो. 
 
2-  शिळी पोळी बनवू शकता ताजी आणि लुसलुशीत 

बऱ्याचदा सकाळची पोळी रात्रीच्या जेवणात खाताना नाक मुरडली जातात,  तर अशावेळी या पोळ्या कुकरमध्ये 1- 2  शिटी देऊन घ्या. यानंतर तव्यावर हलक्या शेकून घ्या .  फ्रेश आणि अगदी लुसलुशीत पोळ्या खाताना सुद्धा रुचकर लागतील. 

3-  लिंबू ठेवा जास्त वेळ ताजे  लिंबांना जास्त दिवस ताजे ठेवण्यासाठी (how to keep lemon fresh for long time)

बऱ्याचदा आपण बाजारातून एकदम लिंबू घेऊ येतो. पण काही दिवसात ते कडक होऊ लागतात आणि चवहीन होऊनजातात, अश्यावेळी बाजारातून आणलेल्या लिंबाना धुवून घ्या आणि  तेल लावून ठेऊन द्या अश्याने लिंबू फार काळ टिकून राहतील. 

4-  नारळास दोन समान भागात तोडण्यासाठी (coconut breaking tips)

नारळ फोडण हे बऱ्याच मुश्किल कामांपैकी एक आहे,  यासाठी एकच करायचं आहे नारळाचे समान दोन भाग करायचे असतील तर त्यावर आपले बोट ठेवून जेथून तोडायचे आहे तेथे बोट ठेवावे व नंतर जोराने आपटावे, नारळ तेथूनच तुटेल याची खात्री आहे.

5-  क्रिस्पी पुऱ्या बनवण्यासाठी  (crispi puri hacks)

पुरीसाठी कणिक मळताना  त्यात २ चमचे गरम केलेलं तेल घाला. 

6-  कुरकुरीत भजी बनवण्यासाठी 

भजीसाठी  मिश्रण बनवण्यासाठी त्यात मक्याचं पीठ घाला

7 - इडली मऊ बनवण्यासाठी (idali making)  

इडलीचं पीठ बनवताना त्यात अर्धे कच्चे तांदूळ मिसळायचे अश्याने इडली छान नरम येते. 

8- उकडलेली अंडी गरम असताना कधीच सोलू नका. काही वेळ थंड पाण्यात ठेवा अश्याने अंड्यांची साल पटकन निघतील. 

9 - चपाती बनवल्यानंतर ज्या डब्ब्यात ठेवता त्यात आल्याचा एक तुकडा ठेवलात तर पोळ्या छान नरम राहतात.

10 - कांदा  कापण्याआधी तो दोन भागात कापून घ्या आणि थंड पाण्यात ठेवा अश्याने कांदा कसप्तांना डोळे झोबणार नाहीत.   

11 - भेंडीची भाजी बनवताना १-२ लिंबाचे थेम्ब घाला अश्याने भेंडीची भाजी चिकट होणार नाही. 

12 -पुरी किंवा भजे तळतांना तेलात मीठ घातल्यास भज्यांमध्ये कमी तेल शोषल्या जाईल.

13-  हिरव्या भाज्या शिजवल्यानंतर त्यांचा रंग जातो त्याकरता भाजी शिजवतांना अर्धा चमचा साखर त्यात घातल्यास भाजीचा रंग जात नाही.

या सर्व आहेत भन्नाट आणि अगदी स्मार्ट किचन टिप्स ज्या वापरून तुम्ही बनाल स्मार्ट आणि सर्वात हटके...  (Kitchen Tips know this cooking tips make food delecious mess free smart kitchen hacks)