Aadhaar-Ration Link | घर बसल्या आधार-रेशन कार्डासह असं लिंक करा

अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड (Aadhaar-Ration Link) असणं बंधनकारक झालंय.  

Updated: Jan 16, 2022, 06:01 PM IST
Aadhaar-Ration Link | घर बसल्या आधार-रेशन कार्डासह असं लिंक करा title=

Aadhaar-Ration Link | देशात गेल्या काही वर्षांमध्ये आधार कार्डांचं महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढलंय. अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड असणं बंधनकारक झालंय. योग्य व्यक्तीची ओळख होण्यासाठी अनेक महत्तावच्या दस्तऐवजांसह आधार लिंक करणं महत्त्वाचं झालंय. त्यापैकी एक महत्तवाचं दस्तऐवज म्हणजे रेशन कार्ड. सर्वसामांन्याना रेशन कार्डद्वारे रास्त दरात अन्न धान्य मिळतं. (know how to link aadhar card to ration card online see full process)

आधार-रेशन कार्डसह लिंक केल्याने तुम्ही 'वन नेशन वन रॅशन कार्ड' या योजनेचा लाभ घेऊ शकता. या योजनेनुसार देशातील कोणत्याही रास्त भाव दुकानातून अन्नधान्य घेऊ शकता. मात्र त्यसााठीही आधार रेशन कार्डसह लिंक असायला हवं. घरबसल्या आधार-रेशन कार्डसह लिंक कसं करायचं हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

असं करा लिंक 

- आधारच्या uidai.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. 

- Start Now'वर क्लिक करा

- त्यानंतर संपूर्ण पत्ता भरावा लागेल. यामध्ये जिल्ह्याचा आणि राज्याचा समावेश असावा.

- अचूक पत्ता टाकल्यानंतर 'Ration Card Benefit' असा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा. 

- त्यानंतर आधार कार्ड क्रमांक, नोंदणीकृत मोबाईल नंबर, सर्व माहिती भरावी लागेल. 

- सर्व माहिती अचूक भरल्यानंतर तुम्हाला मोबाईलवर एक ओटीपी मिळेल.

- रकान्यात ओटीपी टाका. ओटीपी टाकल्यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला एक मेसेज मिळेल. 

- सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर Process Complete असा मेसेज दिसेल. अशा प्रकारे तुमचं आधार रेशन कार्डासह लिंक होईल.