नवी दिल्ली : पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. एका स्थानिक मुस्लिम कुटुंबाचं कथित रुपात धर्मांतर होत असताना झालेल्या हाणामारीत पत्रकारांना मारहाण करण्यात आलीय.
शहरात हिंदू समितीद्वारे एका मुस्लिम कुटुंबाचे १४ सदस्य कथितरित्या हिंदू धर्माचा स्वीकार करत होते. या कार्यक्रमादरम्यान लोकांची बरीच गर्दी जमली होती. यावेळी हिंदू समितीच्या कार्यकर्त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारांना मारहण केल्याचं समजतंय.
#Kolkata: 14 members of a Muslim family allegedly converted to Hinduism at an event by Hindu Samhati. Journalists attacked by Hindu Samhati workers at the venue, reportedly when they tried to speak to the family. pic.twitter.com/Trq35mEWdq
— ANI (@ANI) February 14, 2018
धर्मपरिवर्तन करणाऱ्या मुस्लिम कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे हिंदू समितीच्या लोकांनी आपल्याला मारहाण केल्याचं पत्रकारांचं म्हणणं आहे.
न्यूज एजन्सी 'एएनआय'नंन दिलेल्या माहितीनुसार, कोलकातामध्ये १४ सदस्यीय कुटुंबाचा धर्मांतराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या दरम्यान कार्यक्रमाच्या ठिकाणी काही पत्रकारांवर हिंदू समितीच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला.
एएनआयनं ट्विटसोबत दिलेल्या फोटोंमध्ये, एका पत्रकाराचा चष्माही स्पष्टपणे दिसतोय. तसंच गोंधळाचं वातावरणही या फोटोंतून दिसून येतंय.
या प्रकरणी राज्य सरकार किंवा पोलिसांकडून कोणतंही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.