LIC Policy Link With Pan:देशभरात एलआयसीचे (LIC Policy)करोडो ग्राहक आहेत. या करोडो ग्राहकांसाठी आता मोठी बातमी समोर आली आहे. ग्राहकांना एलआयसीकडून (LIC)अलर्ट जारी करण्यात आला आहे. या अलर्टनुसार जर तुम्ही पॉलिसीधारक असाल तर तुम्हाला 31 मार्च 2023 पुर्वी पॅन कार्ड (Pan card)पॉलिसीशी लिंक करावे लागणार आहे.जर तुम्ही ते नाही केलेत, तर तुम्हाला मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे 31 मार्चची वाट न पाहता आताच पॅन एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) करून घ्या जेणेकरून तुमची चिंता मिटेल.
जर तुम्ही पॉलिसीधारक असाल आणि अद्यापही तुम्ही पॅन कार्ड एलआयसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केले नसेल तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. एलआयसीकडून याबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. तसेच 31 मार्च 2023 ची मुदत देखील देण्यात आली आहे. या मुदतीआधी लिंक न केल्यास मोठा दंड सहन करावा लागणार आहे.
तुम्हाला पॅन लिंक केल्यानंतर त्याच स्टेटस जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही https://www.licindia.in/ वर जाऊन येथे नोंदणी करून तुमची स्थिती जाणून घेऊ शकता.
दरम्यान जर तुम्ही पॅन कार्ड एलआयसी पॉलिसीशी लिंक (LIC Policy Link With Pan) केलेले नसेल, तर तुम्हाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळू शकणार नाही. यासोबतच पॉलिसीशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे आता 31 मार्चची वाट न पाहता आताच लिंक करून घ्या.