Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 10:33 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: असदुद्दीन ओवैसी आघाडीवर 

एआयएमआयएम प्रमुख आणि हैदराबादमधील असदुद्दीन ओवैसी 15461 जागांनी आघाडीवर. 

4 Jun 2024, 10:28 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आंध्र प्रदेशातून सर्वात पहिले कल हाती, इंडिया आघाडीची मुसंडी 

आंध्र प्रदेशातून सर्वात पहिले कल हाती, इंडिया आघाडीची मुसंडी पाहायला मिळत आहे. आंध्र प्रदेशात इंडिया आघाडी 20, टीडीपी 15 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. तर, वायएसआर काँग्रेसला मात्र धक्का. तामिळनाडूतही इंडिया आघाडीची 37 जागांवर सरशी. मध्य प्रदेशात काँग्रेसला एकाही जागेवर आघाडी नाही. सर्व 29 जागांची आघाडी भाजपकडे. 

4 Jun 2024, 10:21 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कोण आघाडीवर कोण पिछाडीवर? 

अयोध्येतून भाजपचे लल्लू सिंह पिछाडीवर 
जोरहाट येथील काँग्रेसचे गौरव गोगोई आघाडीवर 
रायबरेली आणि वायनाडमधून काँग्रेस नेता राहुल गांधी आघाडीवर  
कन्नौजमधून सपाचे अखिलेश यादव आघाडीवर 
अमेठातून काँग्रेसचे के.एल शर्मा आघाडीवर 
कोयंबतूरमधून भाजपचे अन्नामलाई पिछाडीवर 
सुल्तानपूरमधून मनेका गांधी 6000 मतांनी पिछाडीवर 
फुलपूर येथून भाजपचे नवीन पटेल आघाडीवर 
उत्तर मुंबईतून पीयुष गोयल आघाडीवर

4 Jun 2024, 10:15 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अमेठीमध्ये स्मृती इराणी पिछाडीवर 

उत्तर प्रदेशात अमेठीतून भाजपच्या विद्यमान खासदार स्मृती इराणी पिछाडीवर असून, काँग्रेसचे के.एल. शर्मा 10500 मतांनी आघाडीवर आहेत. तर, गुजरातच्या गांधीनगरमधून अमित शाह 2.50 लाख मतांनी आघाडीवर, तर, वाराणासीतून पंतप्रधान मोदी आघाडीवर आहेत. 

 

 

4 Jun 2024, 10:12 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाबरोबरच राज्यातही NDA आणि INDIA मध्ये अटीतटीची लढाई

4 Jun 2024, 09:53 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 500 जागांचे कल हाती... 

आतापर्यंत 500 जागांचे कल हाती आले असून, एनडीएला 297 जागांवर आघाडी मिळाली असून, इंडिया गटाकडे 218 जागांची आघाडी असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला आघाडीचा आलेख पाहायला मिळत असून, उत्तर प्रदेशातही सपा आघाडी घेताना दिसत आहे. तर, अयोध्या आणि अमेठीमध्येही इंडियाला आघाडी... 

 

4 Jun 2024, 09:23 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पंतप्रधान मोदी पिछाडीवर

वाराणासी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी पिछाडीवर तर, काँग्रेसचे अजय राय आघाडीवर. वाराणासी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी 6 हजार 30 मतांनी पिछाडीवर 

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates

4 Jun 2024, 09:19 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आघाडीचा आलेख बदलण्यास सुरुवात 

आताच्या क्षणाची मोठी बातमी. आघाडीचा आलेख बदलण्यास सुरुवात. INDIA आघाडीकडे आता कल दिसून येत असून, एनडीएकडे 280 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. तर, इंडिया आघाडीनं 187 जागांवर सरशी मिळवल्याचं पाहायला मिळत आहे. 

4 Jun 2024, 09:15 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अनुराग ठाकूर यांच्याकडे किती मतांची आघाडी? 

केंद्रीय मंत्री आणि हमिरपूर लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार अनुराग ठाकूर यांनी 6492 मतांनी आघाडील घेतली असून, ही मोठी आघाडी समजली जात आहे. 

4 Jun 2024, 09:10 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 'वारिस पंजाब दे'चे उमेदवार आघाडीवर 

पंजाबच्या खदूर साहिब येथील लोकसभा उमेदवार 'वारिस पंजाब दे' गटाचे प्रमुख अमृतपाल सिंग यांनी 7333 मतांनी आघाडी घेतली आहे.