Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 13:31 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: महबुबा मुफ्ती यांच्या वाट्याला अपयशाची चिन्हं 

पीडीपी प्रमुख आणि अनंतनाग- राजौरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार महबुबा मुफ्ती पिछाडीवर आघाडीवर असून, या जागेवर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार मियां अल्ताफ अहमद 1,84,726 मतांच्या फरकानं आघाडीवर आहेत. 

4 Jun 2024, 13:26 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: रायबरेली, वायनाडमध्ये काँग्रेसचं नाणं खणखणीत 

केरळातील वायनाड लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी 2,22,424 मतांनी आघाडीवर असून, उत्तर प्रदेशातील रायबरेलीमध्येही त्यांच्याकडे  1,64,249 मतांची आघाडी आहे. तेव्हा आता रायबरेली आणि वायनाडमध्ये काँग्रेसचं नाणं खणखणीत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

4 Jun 2024, 12:46 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देश पातळीवरील आकडेवारी काय सांगते?

NDA : 290
भाजप - 244
टीडीपी - 16
जदयू - 15
शिवसेना - शिंदे - 6
राष्ट्रवादी - अजित पवार - 1

I.N.D.I.A - 233
काँग्रेस - 93
समाजवादी पार्टी - 32
तृणमूल काँग्रेस - 31
डीएमके - 21
शिवसेना - ठाकरे - 10
राष्ट्रवादी - शरद पवार - 8 

4 Jun 2024, 12:44 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: काश्मीरमध्ये कल कोणाच्या बाजूनं? 

4 Jun 2024, 12:42 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: प्रज्वल रेवन्नाचा पराभव 

लैंगिक शोषणाचे आरोप झालेल्या प्रज्वल रेवन्नाचा पराभव. आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. हसन लोकसभा मतदारसंघात रेवन्ना पराभूत

4 Jun 2024, 12:34 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तर प्रदेशात सपाच्या कोणत्या उमेदवारांकडे आघाडी? 

उत्तर प्रदेशातील कन्नौज लोकसभा जागेवरून अखिलेश यादव  64,511 मतांनी आघाडीवर असून, डिंपल यादव या मैनपुरी जागेवरून  79,734 मतांनी आघाडीवर आहेत. तिथं उत्तर प्रदेशातच वाराणासी मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी 79,566  मतांनी आघाडीवर आहेत. 

4 Jun 2024, 12:31 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अपेक्षेहून जास्त यश... इंडिया आघाडीच्या नेत्यांची प्रतिक्रिया 

निवडणूक आयोगाच्या वतीनं जाहीर करण्यात आलेल्या नव्या आकडेवारीनुसार रोहतक लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार दीपेंद्र सिंह हुड्डा 1,17,616 मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणी अद्यापही सुरु असून सुरुवातीचे कल पाहता मिळालेलं यश अपेक्षित किंबहुना त्याहूनही जास्त आहे, असं म्हणत हुड्डा यांनी मतदारांचे आभार मानले. 

4 Jun 2024, 12:12 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अमित शाह मोठ्या फरकानं आघाडीवर... 

गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून लोकसभेच्या जागेवर अमित शाह मोठ्या फरकानं आघाडीवर असून, हा फरक 6 लाख मतांचा असल्याचं सांगितलं जात आहे. 

4 Jun 2024, 12:09 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  रायबरेलीमध्ये राहुल गांधी 116100 मतांनी आघाडीवर. आतापर्यंतची आकडेवारी... 

कांग्रेस -218232
भाजपा -102132
बसपा -7178

4 Jun 2024, 12:05 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचा जल्लोष सुरु 

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला जल्लोष सुरु झाला असून, इथं पक्षानं 30 जागांवर आघाडी घेतली आहे. ज्यामुळं पक्ष कार्यकर्त्यांनी टीएमसी कार्यालयाबाहेर जल्लोष सुरु केला आहे.