Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 09:07 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आघाडीवर असणाऱ्या VIP उमेदवारांची यादी 

  • मंडी येथून भाजप उमेदवार कंगना राणौत आघाडीवर
  • हमीरपूर तेथून भाजप नेते अनुराग ठाकूर आघाडीवर 
  • गौतम बुद्ध नगर येथून भाजप उमेदवार महेश शर्मा आघाडीवर
  • पुरीतून भाजपचे संबित पात्रा आघाडीवर 
  • पटना साहिब येथून रविशंकर प्रसाद आघाडीवर 

4 Jun 2024, 09:00 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: अमित शाह आघाडीवर 

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे उमेदवार अमित शाह यांनी गुजरातच्या गांधीनगर येथील लोकसभा मतदारसंघात 7311 मतांनी आघाडी घेतली आहे. 

4 Jun 2024, 08:57 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशभरातील व्हीआयपी नेत्यांपैकी कोण आघाडीवर? 

  • गोरखपूर येथून भाजपचे रवि किशन आघाडीवर 
  • करनाल येथून भाजप नेता आणि माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर आघाडीवर 
  • गुना येथून भाजप उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया आघाडीवर 
  • रायबरेली येथून काँग्रेस नेते राहुल गांधी आघाडीवर 
  • हैदराबाद येथून AIMIM चे असदुद्दीन ओवैसी आघाडीवर 
  • पुर्णिया येथून अपक्ष उमेदवार पप्पू यादव आघाडीवर

4 Jun 2024, 08:52 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 543 पैकी 493 जागांची आघाडी समोर 

543 पैकी 493 जागांची आघाडी समोर आली असून, उत्तर प्रदेशात 40 जागांवर एनडीए आघाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तर, गुजरात 25 जागांवर आघाडीवर आहे. मध्य प्रदेशात एनडीएकडे 29 जागांची आघाडी आहे. 

4 Jun 2024, 08:45 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: एनडीएनं ओलांडला बहुमताचा आकडा 

मतमोजणीच्या पहिल्या कलांनुसार सत्ताधारी एनडीएकडे बहुमत असून आतापर्यंत एनडीएकडे 304 जागांची आघाडी आहे. तर, INDIA च्या वाट्याला 138  जागांची आघाडी आहे. 

4 Jun 2024, 08:42 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मतमोजणीच्या दिवशी शशी थरुर माध्यमांसमोर येत म्हणाले... 

काँग्रेस नेते आणि केरळातील तिरुवअनंतपूरम येथील खासदार शशी थरुर यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा मांडला... आम्ही एकतर जिंकू किंवा अपयशी ठरू... पण, माझ्या दृष्टीकोनातून पाहायचं झाल्यास आमचा विजय होणार आहे. 

4 Jun 2024, 08:38 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तर प्रदेशात 80 पैकी 80 जागांवर भाजपचाच विजय? 

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक यांनी मतमोजणीच्या दिवशी माध्यमांशी संवाद साधताना, भाजपकडे 80 पैकी 80 जागा येणार असून,  विरोधी पक्ष आधारहिन असून, जनतेनंही त्यांना नकार दिल्याचं ते म्हणाले. दरम्यान पहिल्या तासात समोर आलेल्या आकडेवारीनुसार एनडीएला 220 जागांवर आघाडी मिळाली असून, या कलांनुसार भाजपकडेच बहुमत असल्याचं स्पष्ट होत आहे. 

4 Jun 2024, 08:32 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: महाराष्ट्रातील आघाडीचं नेमकं चित्र काय? कोणाला मिळतेय सरशी? 

माढामधून धैर्यशिल मोहिते पाटील आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कोल्हापूरमधून शाहू महाराज आघाडीवर आहेत. सिंधूदूर्ग-रत्नागिरीमधून नारायण राणे आघाडीवर असल्यांचं चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यातून भाजपाचे मुरलीधर मोहोळ आघाडीवर असल्याचं चित्र प्राथमिक कलांमध्ये दिसत आहे. कल्याणमध्येही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र श्रीकांत शिंदे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बारामतीमधून पाहिला कल हाती आला असून पोस्टल मतदानामध्ये सुप्रिया सुळे आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

4 Jun 2024, 08:32 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: दिल्लीमध्ये कोणाला आघाडी? 

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार दिल्लीच्या सर्व 7 जागांवर भाजपला आघाडी मिळाली असून, पंजाबमध्येसुद्धा भाजपला दोन जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, काँग्रेसकडे तीन जागांची आघाडी आहेच. ताज्या आकडेवारीनुसार देशभरात NDA 165 आणि INDIA ला 78 जागांवर आघाडी मिळाली आहे. 

4 Jun 2024, 08:27 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: उत्तराखंडमध्ये काँग्रेसचा पराभव अटळ 

उत्तराखंड येथील हरिद्वार लोकसभा जागेवरील उमेदवार त्रिवेंद्रसिंह रावत यांनी मतमोजणीच्या दिवशी भाजपच्या विजयासंबंधी मोठं वक्तव्य केलं. भाजपच्याच या नेत्यानं म्हटलं, '... हरिद्वार हा काँग्रेसला गड होता. पण, इथं ही पकडही ढिली पडली. इथं भाजपला दोनदा विजय मिळाला. यावेळीसुद्धा भाजप राज्यातील सर्व 5 जागांवर मोठ्या मताधिक्यानं विजय मिळवेल असा विश्वास आहे.'