Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 08:22 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: भाजपचे कोणते उमेदवार आघाडीवर? 

देशातील पहिले कल हाती. भाजपकडे 94 जागांची आघाडी. इंडियाकडे 51 जागांची आघाडी. रामपुरमध्ये भाजप आघाडीवर सपा, पिछाडीवर. भाजपचे उमेदवार, राजनाथ सिंह आघाडीवर. दिल्लीमध्ये भाजपकडे 7 जागांची आघाडी. पश्चिम बंगालमध्येही भाजपकडे 11 जागांची आघाडी. 

4 Jun 2024, 08:17 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशात INDIA ला किती जागांवर आघाडी? 

एकिकडे भाजपकडे पहिल्या कलांची आघाडी असतानाच दुसरीकडे देशात NDA 52 जागांवर, तर INDIA ची 20 जागांवर आघाडी पाहायला मिळत आहे. राहुल गांधी वायनाड आणि रायबरेली दोन्ही जागांवरून आघाडीवर असल्याची माहिती नुकतीच हाती आली आहे. 

4 Jun 2024, 08:13 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: हिमाचल प्रदेशातून कंगना राणौत पिछाडीवर... 

देशभरातील लोकसभा निवडणुकीचे कल हाती येण्यास सुरुवात झाली असूनस हिमाचल प्रदेशातील मंडी येथून अभिनेत्री कंगना राणौत निवडणुकीच्या रिंगणात असून, मतमोजणीच्या पहिल्या तासात त्या पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळत आहे. तिथं कनौज येथून अखिलेश यादव आघाडीवर. 

4 Jun 2024, 08:06 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पहिले कल हाती... 

उत्तर प्रदेशात भाजप एका जागेवर आघाडीवर. टपाली मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर पहिले कल हाती. टपाली अर्थात पोस्टल मतांमध्ये एनडीए 14 जागांवर आघाडीवर. पाहा कशी सुरुये मतमोजणी... 

अधिक वाचा : Lok Sabha Election Results 2024 : निकालाआधीच उघडलं भाजपचं खातं; 'या' राज्यात बिनविरोध विजय 

4 Jun 2024, 07:55 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: आता तरी देवा मला पावशील का... 

लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येण्याआधी या अतिशय महत्त्वाच्या दिवशी देशभरातील राजकीय नेतेमंडळींनी आपआपल्या आराध्य दैवतांपुढे नतमस्तक होत आशीर्वाद घेतल्याचं पाहायला मिळालं. 

4 Jun 2024, 07:10 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: एनडीला निकालाआधीच एका जागेवर मिळाला बिनविरोध विजय 

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याआधीच किंबहुना मतमोजणी सुरु होण्यापूर्वीच गुजरातमधील एका जागेवर एनडीएला बिनविरोध विजय मिळाला. इथं परिस्थितीच अशी तयार झाली, की निवडणुकीचीच गरज लागली नाही आणि भाजप उमेदवार मुकेश दलाल यांचा बिनविरोध विजय जाहीर करण्यात आला. 

4 Jun 2024, 06:48 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: बहुमत न मिळाल्यास? 

सत्ताधाऱ्यांना जनतेचं बहुमत मिळवण्यात अपयश मिळालं तर, त्यांच्या वतीनं सत्तेचं हस्तांतरण निश्चित करत संविधानानं आखून दिलेल्या मर्यादांचं पालन करावं, ही बाब निवृत्त न्यायाधीशांनी राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांना अनुसरून लिहिलेल्या पत्रात अधोरेखित केली. राष्ट्रपती आणि सरन्यायाधीशांसह निवडणूक आयोगाच्या आयुक्तांना अनुसरून लिहिण्यात आलेल्या या Open Letter वर जी. एम. अकबर अली, अरुणा जगदीसन, डी. हरिपरन्थमन, पी.आर. शिवकुमार, सी.टी. सेल्वम, एस. विमला या मद्रास उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीशांची स्वाक्षरी असून, पटना उच्च न्यायालयातील निवृत्त न्यायाधीश अंजना प्रकाश यांचीही स्वाक्षरी या पत्रावर आहे. 

4 Jun 2024, 06:14 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कुठे पाहता येतील लोकसभा निवडणूक निकालांचे Live आकडे? 

www.results.eci.gov.in या संकेतस्थळावर तुम्ही लोकसभा निवडणूक निकालाचे आकडे पाहू शकता. 

  • सर्वप्रथम वरील संकेतस्थळाला भेट द्या आणि तिथं Parliamentary Constituencies वर क्लिक करा. तुमच्यासमोर सविस्तर यादी येईल. 
  • तुम्हाला एखाद्या ठराविक जागेचे निकाल अपेक्षित असल्यास राज्य आणि त्यानंतर मतदारसंघ निवडा. 
  • मतदान प्रक्रिया सुरु झाल्यानंतर काही वेळातच ही आकडेवाही संकेतस्थळावर अपडेट होण्यास सुरुवात होईल. 
  • iOS आणि अँड्रॉईड मोबाईल वर Voter Helpline अॅपचाही वापर तुम्ही करू शकता. 

4 Jun 2024, 06:09 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 18 व्या लोकसभेत बाजी कोण मारणार? 

तब्बल 43 दिवसांसाठी चाललेल्या 18 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काही तासात जाहीर होणार असून, आता पहिले कलही येण्यास सुरुवात होणार आहे. भाजपप्रणीत एनडीएला एक्झिट पोलमध्ये कौल मिळालेले दिसले. त्यानुसार देशात त्यांचीच सत्ता कायम राहते की, इंडिया आघाडीला मतदार संधी देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

4 Jun 2024, 05:54 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  महाराष्ट्रात प्रतिष्ठेची लढाई 

राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढाई रंगल्याचं यंदा पाहायला मिळालं. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक पार पडली. शिवसेनेतल्या फुटीनंतर राज्यातील जनता शिंदे की ठाकरे कुणाला पसंती देणार हे या निकालातून समोर येणार आहे. अजित पवारांच्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे दोन तुकडे झालेत. पहिल्यांदाच अजित पवार विरुद्ध शरद पवार अर्थात काका विरुद्ध पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याशिवाय महायुतीत पुन्हा एकदा मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे येणार का, याकडेही सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत.