Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 16:16 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कर्नाटकमध्ये भाजपचा विजय 

कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे भाजपनं विजय मिळवला आहे. गोविंद मकथप्पा करजोल यांनी या लढतीमध्ये 48,121 मतांनी बीएन चंद्रप्पा यांना मागे टाकलं.

4 Jun 2024, 16:13 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: इंडिया आघाडीच्या बैठकीवर सर्वांच्याच नजरा 

एकिकडे लोकसभा निवडणुकीचे निकाल समोर येण्यास सुरुवात केलेली असतानाच दुसरीकडे आता राजकीय समीकरणांना अधिक वाव मिळताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आणि काही नेतेमंडळींच्या माहितीनुसार बुधवारी दिल्लीमध्ये सत्ताधारी एनडीएतील घटक पक्षांनी बैठक बोलवली आहे. तर, तिथं काँग्रेसनंही मोर्चेूबांधणी सुरू केली आहे. सर्व मित्रपक्षांसोबत काँग्रेसनं संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, बुधवारी इंजिया आघाडाचीही बैठक बोलवण्यात आली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

4 Jun 2024, 16:04 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: जालंधरमधून काँग्रेसचा विजय 

पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेता चरणजीत सिंह चन्नी यांनी जालंधरमधील जागेवर विजय मिळवला असून, त्यांनी 1,75,993 मतांच्या फरकानं विजय मिळवला आहे. 

4 Jun 2024, 16:01 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: नितीश कुमार NDA सोबतच? 

सोमवारीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार परतले असून, आमचा पक्ष पूर्वीच्याच भूमिकेवर ठाम असल्याची माहिती जेडीयू नेता केसी त्यागी यांनी दिली आहे. 

4 Jun 2024, 15:44 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: कंगना राणौत विजयी 

हिमाचल प्रदेशातील मंडी या मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणौत विजयी झाली असून, हा विजय सनातनचा आहे, असं म्हणत तिनं आभार मानले. 

4 Jun 2024, 15:41 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: इंडिया आघाडीत घडामोडींना वेग....

इंडिया आघाडीला मिळालेले कल आणि त्यानंतर हाती येणारं यश पाहता काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी इंडिया आघाडीच्या नेत्यांची ये-जा सुरू झाली आहे. एएनाय य़ा वृत्तसंस्थेनं काँग्रेस नेते जयराम रमेश खरगे यांच्या निवासस्थानी पोहोचले तो क्षण टीपला.... 

4 Jun 2024, 15:08 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  इंडिया आघाडीला मिळालेल्या पाठिंब्यानंतर शरद पवार म्हणाले... 

'उत्तर प्रदेशच्या जनतेनं वेगळा निकाल दिला. यापूर्वी उत्तर प्रदेश आणि या भागात जे यश मिळायचं ते फार मोठं असायचं आता मिळालेला विजय कमी मताधिक्याने मिळाला आहे. याचा अर्थ आम्ही राष्ट्रीय पातळीवर जे काम करतो त्याला लोकांनी दिलेला प्रतिसाद आहे', असं शरद पवार म्हणाले. 

हा निकाल परिवर्तनास पोषक असून, सध्या हाती आलेल्या आकडेवारीनुसार राजस्थान, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात वेगळा निकाल लागला. सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची जबाबदारी घेतल्या कारणानं हे यश इंडिया आघाडीच्या वाट्याला आलं. येत्या काळात आमची धोरणं ठरवून महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करू असं सांगत इंडिया आघाडीची बैठक पार पडणार असल्याचं शरद पवार म्हणाले. दरम्यान आपला चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्याशी फोनवर चर्चा झाली नसल्याचंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं. 

4 Jun 2024, 14:02 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: इंडिया आघाडीच्या वतीनं शरद पवार यांच्याकडे मोठी जबाबदारी 

नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा करण्याची जबाबदारी शरद पवार यांच्यावर सोपवण्यात आली असून, शरद पवारांचा नितीश कुमारांना फोन गेल्याचं म्हटलं जात आहे. सत्ता स्थापनेसाठीची मॅजिक फिगर गाठण्यासाठी एनडीएतून नितीशकुमार व चंद्राबाबू नायडू यांना इंडिया आघाडीत आणण्याची जबाबदारी पवारांवर सोपवण्यात आली असून, नितीश कुमार यांना उप पंतप्रधानपदाची ऑफर देण्यात 
आल्याचंही सूत्रांचं म्हणणं आहे. 

4 Jun 2024, 13:52 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  #ZEENIA नं वर्तवला Exact अंदाज; 400 पार चा फुगा फुटला

झी मीडियाच्या वतीनं AI Exit Poll च्या माध्यमातून #ZEENIA नं वर्तवलेल्या अंदाजांनुसार देशात इंडिया आघाडीलासुद्धा चांगलं यश मिळताना दिसत आहे. विरोधकांनी भाजपला टोला लगावत 400 पार चा फुगा फुटला असं म्हणत हिणवलं. राजद नेता मनोज झा यांनी यावेळी, 'भाजप एकूण 220-230 जागांवर पोहोचल असून, बहुमतापासून पक्ष अजूनही दूर आहे. चंद्राबाबू आणि जेडीयुची मतं न जोडल्यास भजपला बहुमताचा आकडा ओलांडता येणार नाही' असं म्हटलं. 

4 Jun 2024, 13:38 वाजता

Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देश पातळीवर राजकीय घडामोडींना वेग... 

देश पातळीवर लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले असता आता एनडीए आणि इंडिया आघाडीमध्ये असणारा आघाडीचा फरक कमी होताना दिसत असून, मोठ्या पक्षांकडून लहान पक्षांची मनधरणी करण्याची सूत्र वेगानं सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. इथं नितीश कुमार आणि काँग्रेस यांच्याच चर्चा सुरु असतानाच तिथं नितीश कुमार मात्र भाजपसोबतच जाणार का? हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.