Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Election Results 2024 Live: लोकसभा निवडणूक निकालातील सर्वात मोठ्या आणि ताज्या घडामोडी पाहा एका क्लिकवर... Live Updates च्या माध्यमातून मिळवा निकालाच्या दिवसाची A to Z माहिती...  

Lok Sabha Nivadnuk Nikal LIVE 2024: आज दिल्लीत खलबतं, सत्तास्थापनेसाठी इंडिया आघाडी जोर लावणार?

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: देशाची आर्थिक आणि राजकीय स्थिती पाता अनेक राजकीय उलथापालथींनंतर आणि खघडामोडींसह पक्षबदलनांनंतर अखेर देशात लोकसभेची निवडणूक पार पडली. सात टप्प्यांमध्ये घेण्यात आलेल्या याच निवडणुकीचे निकाल जाहीर होत असून, या निकालांकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. देशात सत्तापरिवर्तन होणार ? महाराष्ट्रात काय घडणार याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिली आहे. निकालाचे पहिले कल पाहता बहुमताचं झुकतं माप एनडीएकडे असून, आता देशात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडीची सरशी होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

4 Jun 2024, 11:56 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  काँग्रेसची पक्षबांधणी सुरू, सत्तासमीकरण कसंय पाहा... 

इंडिया आघाडीलासुद्धा लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये समधानकारक आकडेवारी पाहायला मिळत असून, एकंदर जागांवरील आकडेवारी पाहता काँग्रेस पक्षाकडून टीडीपी आणि नितीश या दोघांशीही चर्चा करेल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

4 Jun 2024, 11:53 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates:  जन्मभूमीच्या सेवेसाठी मी सदैव तत्पर- कंगना राणौत 

हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असणाऱ्या भाजप उमेदवार कंगना राणौतनं हिमाचल ही आपली जन्मभूमी असून, मी येथील नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर असेन असं म्हटलं. सर्वांची साथ, सर्वांचा विकास हे पंतप्रधानांचं स्वप्न असून आपली त्यांना कायम साथ असेल असंही कंगना म्हणाली. 

4 Jun 2024, 11:39 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पहिल्या 3 तासांनंतर देशात कल बदलले, महाराष्ट्रात 'भाकरी फिरली'

अधिक वाचा : Maharashtra Nivadnuk Nikal 2024 LIVE: कोल्हापूरमधून शाहू महाराज 25 हजार मतांनी आघाडीवर

4 Jun 2024, 11:26 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: ... तर सत्ता इंडिया आघाडीची 

'काँग्रेसनं 100 जागांवर विजय मिळवल्यास देशात इंडिया आघाडीचं सरकार असेल. काँग्रेस पक्षाला 150 जागांवरही विजय मिळू शकते. जर देशात काँग्रेस मोठा पक्ष ठरला तर याच पक्षाचा पंतप्रधान असणार आहे. देशातील नागरिकांचीसुद्धा हीच इच्छा पाहायला मिळत आहे', अशा आशावादी सूर संजय राऊत यांनी आळवला. 

4 Jun 2024, 11:07 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: शेअर बाजार कोसळला 

 निवडणूक निकालांची आकडेवारी जाहीर होत असतानाच शेअर बाजारातून सर्वाच मोठी बातमी समोर आली. निकालांचे कल हाती आले त्या क्षणी सेन्सेक्स 3000 अंकांनी कोसळला असून, निफ्टी 900 अंकानीं कोसळला आहे. 

4 Jun 2024, 11:03 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: INDIA च्या उत्तम कामगिरीचं श्रेय राहुल गांधी यांना - संजय राऊत 

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी वृत्तसंस्थेशी संवाद साधताना निवजणुकीचे हाती आलेले पहिले कल पाहता त्याव आपली प्रतिक्रिया दिली. 'संपूर्ण देशामध्ये INDIA आघाडीला मिळणारं यश पाहता त्याचं श्रेय राहुल गांधी यांना दिलं पाहिजे. त्यांच्या नेतृतत्वाच्याच बळावर काँग्रेसनं 150 जागांपर्यंत आघाडी घेतील असून, हे मोठं यश आहे. INDIA आघाडी बहुमताच्या दिशेनं वाटचाल करताना दिसत आहे', असं ते म्हणाले. 

4 Jun 2024, 10:57 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: 543 जागांचे कल हाती, काय आहे नवी आकडेवारी ? 

लोसकभा निवडणुकीतील 543 कलांपैकी 290 जागांवर एनडीएला आघाडी असून, 225 जागांवर इंडिया आघाडीला सरशी मिळाल्याचं दिसत आहे. इतर पक्षांना 28 जागांवर आघाडी मिळाली असून नुकतीच ही आकडेवारी समोर आली आहे. 

4 Jun 2024, 10:51 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री आघाडीवर 

मध्य प्रदेशात माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान विदीषा मतदारसंघातून 1,88,350 मतांनी आघाडीवर. पुढील मतमोजणी अद्यापही सुरुच.

4 Jun 2024, 10:48 वाजता

Lok Sabha Lok Sabha Election Results 2024 Live Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे किती मतांची आघाडी? 

  • वाराणासीतून पंतप्रधान मोदी 85,152 मतांनी आघाडीवर 
  • गांधीनगर येथून भाजपचे अमित शाह 1,88,664 मतांनी आघाडीवर 
  • वायनाडमधून काँग्रेस नेते राहुल गांधी 80,203 मतांनी आघाडीवर 
  • आलप्पुझातून काँग्रेसचे केसी वेणुगोपाल 14,435 मतांनी आघाडीवर 
  • बँगळुरू दक्षिण येथून भाजपचे तेजस्वी सूर्य 69,365 मतांनी आघाडीवर 
  • पाटलीपुत्र येथून राजदच्या मीसा भारती 7,993 मतांनी आघाडीवर  

4 Jun 2024, 10:43 वाजता