Union Budget 2024 Live Updates in Marathi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर करणार असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर केला जाणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि सत्तास्थापना पार पडल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प देशातील सरकारकडून सादर केला जाईल.
दरम्यान, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच सविस्कर अर्थसंकल्प सादर केला जाईल असं म्हणताना पुन्हा एकदा मोदी सरकार असेच संकेत दिल्याचं पाहायला मिळालं. तूर्तास यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात कोणत्या विशेष तरतुदी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
1 Feb 2024, 11:23 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास
कोरोना संकटानं चहुबाजूंनी विळखा घातला असताना भारतानं मात्र यातून यशस्वीपणे वाट काढली. देशातील पायाभूत सुविधांमध्ये काही अमूलाग्र बदल करण्यात आले. पुढची पाच वर्ष ही उज्वल भवितव्याची आणि भारताच्या सुवर्णमयी भविष्याची असणाप आहेत. 'सबका प्रयास' च्या माध्यमातून यावेळी अर्थमंत्र्यांनी प्रत्येक भारतीयाचं योगदान अधोरेखित केलं. देशात सध्या अधिकाधिक संधी निर्माण होत असल्याची बाब त्यांनी यावेळी मांडली.
1 Feb 2024, 11:19 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: महिला सबलीकरण
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भारतामध्ये 70 टक्के महिलांना त्यांच्या घराची संपूर्ण किंवा जोड मालकी देत महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करण्यात आलं. आमचं सरकार हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काम करत असल्याचा मुद्दा अर्थमंत्र्यांनी पुन्हा अधोरेखित केला. नागरिक चांगली जीवनशैली जगत असून, त्यांचा अर्थार्जनाचा स्तरही उंचावला आहे. सध्या नागरिकांना त्यांची ध्येय्य गाठता येत आहेत. तरुणांना सशक्त करण्याचाच या सरकारचा प्रयत्न आहे.
1 Feb 2024, 11:18 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: महिला सबलीकरण
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भारतामध्ये 70 टक्के महिलांना त्यांच्या घराची संपूर्ण किंवा जोड मालकी देत महिलांचा आत्मविश्वास वाढवण्याचं काम करण्यात आलं. आमचं सरकार हे नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत काम करत असल्याचा मुद्दा अर्थमंत्र्यांनी पुन्हा अधोरेखित केला. नागरिक चांगली जीवनशैली जगत असून, त्यांचा अर्थार्जनाचा स्तरही उंचावला आहे. सध्या नागरिकांना त्यांची ध्येय्य गाठता येत आहेत. तरुणांना सशक्त करण्याचाच या सरकारचा प्रयत्न आहे.
1 Feb 2024, 11:15 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: अर्थसंकल्पातील महत्त्वाचे मुद्दे...
78 लाख फेरीवाल्यांना थेट मदत केल्याचं सांगत गरिबाचं कल्याण म्हणजे देशाच कल्याण हा मुद्दा अर्थमंत्र्यांन अर्थसंकल्प सादर करताना मांडला. यावेळी दीड कोटी शेतकऱ्यांना पीएम विमा योजनेचा फायदा मिळाल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
1 Feb 2024, 11:12 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: 25 कोटी लोकांना आम्ही गरीबीमधून बाहेर काढलं : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
सर्वांगीण आणि सर्वसामावेशक बजेट तयार करण्यात आलं आहे. कोरोना काळानंतर अर्थव्यवस्थेत आम्ही अमुलाग्र बदल केला आहे. 80 कोटी लोकांना मोफत राशन दिल्याची माहिती अर्थमंत्र्यांनी दिली. गरिबींच्या खात्यात जनधनच्या माध्यमातून 34 लाख कोटी रुपये जमा करण्यात आल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
1 Feb 2024, 11:10 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: 2047 पर्यंत भारताला विकसित भारत करण्याचं आमचा उद्देश आहे.
गरीब, महिला, युवा आणि अन्नदाता या चौघांच्या विकासावर लक्ष ठेवण्याची गरज. त्यांचा विकास हा आमची सर्वात मोठं प्राधान्य क्रमाला असणार आहे. त्यांचा विकास म्हणजे देशाचा विकास असं समिकरण आहे, असं अर्थमंत्री म्हणाल्या.
"We need to focus on - Garib, Mahilayen, Yuva and Annadata; Their needs and aspirations are our highest priorities," says Finance Minister Nirmala Sitharaman in her interim Budget speech. pic.twitter.com/6HoDXsdx2R
— ANI (@ANI) February 1, 2024
1 Feb 2024, 11:08 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प
सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशक अर्थसंकल्प... अर्थमंत्र्यांची ग्वाही. समाजिक न्याय ही अनेकांसाठी राजकीय घोषणा होती, पण आमच्यासाठी हा कामाचा मूळ भाग आणि हेतू आहे, असं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना सुरुवातीलाच स्पष्ट केलं.
1 Feb 2024, 11:05 वाजता
Union Budget 2024 Live Updates in Marathi: संसदेत अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात
Union Minister Nirmala Sitharaman presents the Union Interim Budget 2024-25 at the Parliament. pic.twitter.com/ooIT0ztsof
— ANI (@ANI) February 1, 2024
1 Feb 2024, 10:37 वाजता
Budget 2024 LIVE Updates: शेअर बाजारत जोरदार हालचाली
अर्थसंकल्पाच्या दिवशी शेअर बाजारतही मोठ्या हालचाली सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला सेंसेक्स 120 अंकांनी वर असून, Paytm ला मात्र 20% चं लोअर सर्किट लागलं आहे.
1 Feb 2024, 10:09 वाजता
Budget 2024 LIVE Updates: अर्थसंकल्पात महिलांसाठी कोणतं सरप्राईज?
मागील वर्षी अर्थात 2023 च्या अर्थसंकल्पात देशातील महिलांसाठी महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना जाहीर करण्यात आली होती. या एकवेळ बचत योजनेत महिलांना 7.5 टक्के व्याज दिलं जातंय. यंदाही अर्थसंकल्पाकडून महिलांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा असू शकतात, असं मानलं जात आहे.
हेसुद्धा वाचा : Budget 2024: आजच्या बजेटमध्ये महिलांसाठी काय खास गोष्टी असणार? 'या' महत्त्वाच्या घोषणांची अपेक्षा