Budget 2024 LIVE Updates: आयकर प्रणालीमध्ये कोणताही बदल नाही; किती उत्पन्नावर Tax नाही?

Budget 2024 LIVE Updates: निवडणूकपूर्व अंतरिम अर्थसंकल्पात लोकप्रिय घोषणांचा पाऊस अपेक्षित, किसान सन्मानचा निधी 8000वर नेण्याचे र्थमंत्रालयाचे संकेत  

Budget 2024 LIVE Updates: आयकर प्रणालीमध्ये कोणताही बदल नाही; किती उत्पन्नावर Tax नाही?

Union Budget 2024 Live Updates in Marathi: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 (आज) सादर करणार असून, हा मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील अखेरचा अर्थसंकल्प असणा आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या आधी सादर केला जाणारा हा अंतरिम अर्थसंकल्प असून, त्यानंतर निवडणुकांचे निकाल आणि सत्तास्थापना पार पडल्यानंतर सविस्तर अर्थसंकल्प देशातील सरकारकडून सादर केला जाईल. 

दरम्यान, बुधवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी माध्यमांशी संवाद साधताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लवकरच सविस्कर अर्थसंकल्प सादर केला जाईल असं म्हणताना पुन्हा एकदा मोदी सरकार असेच संकेत दिल्याचं पाहायला मिळालं. तूर्तास यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमण मतदार, पगारदार आणि एकंदर सर्व घटकांना अंदाजात घेत अर्थसंकल्पात कोणत्या विशेष तरतुदी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

1 Feb 2024, 09:15 वाजता

Budget 2024 LIVE Updates: आपल्या टीमसोबत अर्थमंत्री निर्मला सीतारमण 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थ मंत्रालयाबाहेर त्यांच्या टीमसोबत उभं राहत देशाता अर्थसंकल्प माध्यमांपुढे आणला आणि अतिशय प्रसन्न मुद्रेनं त्या पुढे निघाल्या. 

1 Feb 2024, 09:04 वाजता

Budget 2024 LIVE Updates: कसा असेल अर्थमंत्र्यांचा दिनक्रम? 

सकाळी साधारण 8.15 मिनिटांनी स्वत:च्या घरातून निघाल्यानंत अर्थमंत्री निर्मला सीतारमण 8.50 मिनिटांपर्यंत त्यांच्या टीमसोबत चर्चा करतील. ज्यानंतर अर्थ मंत्रालयाच्या प्रवेशद्वार क्रमांक 2 वर संपूर्ण आढावा घेतला जाईल. पुढे इथूनच त्या राष्ट्रपती भवनात आणि त्यानंतर संसद भवनात पोहोचतील.  

1 Feb 2024, 08:53 वाजता

Budget 2024 LIVE Updates: गॅस दरात वाढ 

केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. कारण, गॅस दर पुन्हा वाढले आहेत. अर्थात हे घरगुती वापरातील गॅस सिलेंडर नसून, व्यावसायिक गॅसच्या दरात ही दरवाढ लागू करण्यात आली आहे. व्यावसायिक गॅस 14 रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत. परिणामी आता हॉटेलमधील खाणं महागण्याची शक्यता आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही. 

हेसुद्धा वाचा : Budget 2024: कमोडिटी क्षेत्राच्या काय अपेक्षा आहेत? तज्ज्ञांकडून जाणून घ्या 10 सर्वात मोठ्या मागण्या

 

 

1 Feb 2024, 07:50 वाजता

 

Budget 2024 LIVE Updates: अर्थमंत्री निर्मला सीतारमण प्रस्थापित करणार अनेक नवे विक्रम 

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात पाच वर्ष सलग देशाचा आर्थिक गाडा हाकरणाऱ्या सीतारमण या पहिल्या महिला बनतायत. सीतारमण यांनी आतापर्यंत पाच पूर्ण आणि आजचा अंतरिम अर्थसंकल्प असे एकूण ६ अर्थसंकल्प सादर केलेत. सलग सहा वेळा अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम मोरारजी देसाईंच्या नावे आहे. जुलै 2019 पासून सीतारमण यांनी पाच पूर्ण अर्थसंकल्प सादर केले आहेत. आजच्या भाषणानंतर निर्मला सीतारमण मनमोहन सिंह, अरुण जेटली, पी चिदंबरम आणि यशवंत सिन्हा या सर्वांना मागे टाकतील. या मंत्र्यांनी प्रत्येकी पाच अर्थसंकल्पीय भाषणं केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2019 मध्ये निवडणूकीत पूर्ण बहुमत मिळाल्यावर निर्मला सीतारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाची सूत्र सोपवली. तेव्हापासून आज तागायत सीतारमण यांनी ही जबाबदारी समर्थपणे पेलली आहे असं म्हणायला हरकत नाही.

1 Feb 2024, 07:38 वाजता

Budget 2024 LIVE Updates: अर्थसंकल्पाकडून नेमक्या काय अपेक्षा? 

अर्थसंकल्प जरी अंतरिम असला अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या भाषणातून अनेक अपेक्षा आहेत. ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात अर्थसंकल्पातून काय काय घोषणा होऊ शकतात?१ किसान सन्मान निधीमध्ये २००० रुपयांची वाढीची घोषणा होऊ शकते

  •  केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतनाचा बेसिक आणि डीए एकत्र करुन नवा बेस तयार करण्याची घोषणा
  •  मनरेगासाठीच्या खर्चात घसघशीत वाढ अपेक्षित
  •  देशातील रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रासाठी मोठं अनुदान जाहीर होण्याची शक्यता
  •  इंधनावरील एक्साईज म्हणजेच उत्पादन शुल्कात कपात अपेक्षित
  •  खासगी कंपन्यांकडून वितरीत होणाऱ्या लाभाशांवर सध्याच्या दुहेरी कर आकारणी होते. हा दुहेरी कर रद्द व्हावा अशी अपेक्षा आहे
  •  मध्यमवर्गीय नोकरदार वर्गाला स्टँडर्ड डिडक्शनची सुविधा मिळते. याची सध्याची मर्यादा ५० हजार रुपये आहे. गेली अनेक वर्ष ही मर्यादा टक्क्यांमध्ये असावी अशी मागणी आहे. ही मागणी पूर्ण होणार का याकडे लक्ष असेल
  •  संरक्षण खर्चात वाढ होण्याची शक्यता
  • देशात सध्या सुरु असणाऱ्या पायभूत सुविधांसाठीच्या खर्चात कपात होऊ नये यासाठी प्रयत्न अपेक्षित

 

1 Feb 2024, 06:54 वाजता

Budget 2024 LIVE Updates: विकासदराचे आकडे 

विकासदराचे आकडे साडे सात टक्क्याच्या दिशेने घोडदौड करत असले तरी हा विकास सरकारी पायाभूत सुविधांवर होणाऱ्या खर्चामुळे होतोय असं चित्र आहे. प्रत्यक्ष नागरिकांनी केलेल्या खर्चामुळे अर्थव्यवस्थेत जी मजबूती येते ती अद्यापही फारशी दिसत नाही.त्यावर सीतारमण यांच्या भाषणातून उत्तर मिळतंय का याकडे अर्थविश्वाचं लक्ष असणार आहे. 

हेसुद्धा वाचा : Budget 2024: सध्याचे Income Tax Slab कसे? Old आणि New Tax Regime मध्ये फरक काय?

 

1 Feb 2024, 06:53 वाजता

Budget 2024 LIVE Updates:नव्या संसदभवनातील हा पहिलाच अर्थसंकल्प

नव्या संसदभवनातील हा पहिलाच अर्थसंकल्प असेल. २०२४ सार्वत्रिक निवडणूक जेमतेम महिन्याभरावर येऊन ठेपलेली असताना आजच्या भाषणातून अर्थमंत्री सीतारमण नागरिकांवर कोणतीही नवी ओझी टाकणार नाहीत हे जवळपास निश्चित आहे. पण त्यासोबतच कोरोनानंतर सलग तिसऱ्या वर्षी जगातील सर्वात वेगवान विकासदराची अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतील नागरिकांना अर्थमंत्री या विकासाचा फायदा प्रत्यक्ष लोकांपर्यंत मिळतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

1 Feb 2024, 06:48 वाजता

Budget 2024 LIVE Updates: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण  (Finance Minister Nirmala Sitharaman) अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी  2024 रोजी सकाळी 11 वाजता संसदेत सादर करणार आहेत. त्या सहाव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार असून, यावेळी अर्थसंकल्पावर सर्वांच्याच नजरा असणार आहेत.