तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन

NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय. 

नेहा चौधरी | Updated: Jun 6, 2024, 07:25 AM IST
तिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन title=
loksabha 2024 narendra modi as nda leader nitish chandrababu also support

NDA : देशात तिसऱ्यांदा मोदी सरकारच बनणार हे आता निश्चित झालंय. एनडीएच्या बैठकीत चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांनी एनडीए सरकारला आपला पाठिंबा दिला. आता 7 जूनला एनडीए सरकार बनवण्याचा दावा करणार आहे. तर 8 जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊ शकतात. तसंच या बैठकीत एकमताने नरेंद्र मोदी यांची नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे.  एनडीएच्या प्रमुख घटकपक्षांची बैठक दिल्लीत पार पडली. बैठकीला उपस्थित 21 पक्षांच्या नेत्यांनी या प्रस्तावावर स्वाक्षरी केलीय.त्यामुळे लोकसभा निकालानंतर चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्या राजकीय भूमिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम लागलय. 

तिसऱ्यांदा मोदी सरकारचा शनिवारी शपथविधी?

शुक्रवार 7 जूनला सकाळी 11 वाजता भाजप संसदीय पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची भाजपच्या नेतेपदी निवड होणार आहे. त्यानंतर एनडीएचे सर्व प्रमुख नेते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मंत्रिमंडळ स्थापनेचा दावा करणार आहे. त्यानंतर एनडीएच्या सर्व खासदारांची दुपारी 2 वाजता बैठक होणार असून या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड होणार आहे. या सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शनिवारी 8 जूनला नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. 

राष्ट्रपतींकडून लोकसभा विसर्जित, नरेंद्र मोदींचा राजीनामा!

दरम्यान मंगळवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने बैठकीत केलेल्या शिफारशीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना 17 वी लोकसभा तातडीने विसर्जित केली आहे. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी बुधवारी सकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत केंद्रीय मंत्रिमंडळासह पंतप्रधानपदाचा राजीनामा सोपवला आहे. तर राष्ट्रपतींनीही पंतप्रधानांसह मंत्रिमंडळाचा राजीनामा स्वीकारला आहे. तरी नव्या सरकारने कार्यभार स्वीकारेपर्यंत नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळांने आपली सेवा बजावावण्याचा सूचना त्यांनी दिल्या आहेत. राष्ट्रपती द्रौपती मुर्मु यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकारच्या सर्व विद्यमान मंत्र्यांना डिनरसाठी आमंत्रित दिलंय. केंद्रीय मंत्रीमंडळाच्या शपथविधीसाठी राष्ट्रपती भवन 5 ते 9 जूनदरम्यान सर्वसामान्य लोकांसाठी बंद असणार आहे.