Crime News : शॉपिंग आणि बायको जणू हे समीकरण ठरलंय. अनेक नवरे हे बायकांच्या खर्चापायी त्रस्त असतात. पण एका व्यक्तीने आपल्या दुसऱ्या पत्नीच्या खर्चिक स्वभावामुळे टोकाच पाऊल उचलं. पत्नीच्या खर्चाला कंटाळून त्याने मित्रांच्या मदतीने तिचा काटा काढला. हो, या व्यक्तीने आपल्या पत्नीची हत्या केली. एवढंच नाही तर पोलिसांना दाखविण्यासाठी अपघाती निधन असल्याचा भासवलं.
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातून या घटनेने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय. कोणी कल्पनाही केली नाही करणार अशी घटना समोर आलीय. आरोपी पतीने पत्नीचा इको स्पोर्ट्स कारने अपघात घडवला. घटनेच्या वेळी पत्नी भावासोबत दुचाकीवरून जात होती. कार अपघातात पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिसांनी तपास केला असता, सुरुवातीला हे प्रकरण रस्त्यावरील अपघाताचे जाणवत होते. मात्र तपास केला असता प्रकरण वेगळेच वळण निघाले. खुनाच्या या खळबळजनक घटनेचा खुलासा करत आरोपी पती आणि त्याच्या एका साथीदाराला अटक करण्यात आली आहे. अन्य दोघांचा शोध पोलीस घेत आहेत.
हे संपूर्ण प्रकरण ग्वाल्हेरच्या झाशी रोड भागातील आहे. इथे 13 ऑगस्टला भाऊ संदेशसोबत दुचाकीवरून जात असलेल्या दुर्गावती यांना विकी फॅक्टरीजवळ इको स्पोर्ट्स कारने धडक दिली. यानंतर दुर्गावती आणि संदेश यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे दुर्गावती यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपासादरम्यान दुर्गावतीचे पतीसोबत भांडण होत असल्याचे पोलिसांना आढळून आले. गेल्या काही दिवसांपासून दुर्गावतीचे अजय भार्गवसोबतचे संबंध चांगले नव्हते.
तपासादरम्यान अजय भार्गवने दुर्गावतीसोबत दुसरं लग्न केल्याचं पोलिसांना समजलं. पत्नीच्या खर्चामुळे तो त्रस्त होता. अशा परिस्थितीत पत्नीची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने मित्रांची मदत घेतली. रस्त्याच्या अपघातात पत्नीच्या मृत्यूची योजना त्यांनी आखली. ज्यामध्ये त्याने झाशी इथे राहणाऱ्या काही मित्रांना इको स्पोर्ट्स कारमधून ग्वाल्हेरला बोलावलं. ृ
विकी फॅक्टरीजवळ या आरोपींनी भावासोबत जात असलेल्या दुर्गावती यांच्या दुचाकीला धडक दिली. ज्यात दुर्गावती यांचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध खुनाच्या कलमान्वये गुन्हा दाखल केलाय. दरम्यान, चौकशीदरम्यान अखेर पती अजयने पत्नीच्या हत्येची कबुली दिली. पोलिसांना दिलेल्या कबुलीमध्ये तो म्हणाला की, पत्नीच्या खर्च करण्याच्या सवयींना कंटाळला होता.