LPG Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा

जुलै महिन्याची सुरूवात चांगल्या बातमीने झाली आहे. सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने LPG Gas Cylinder च्या किंमतींमध्ये कपात केली आहे.

Updated: Jul 1, 2022, 10:01 AM IST
LPG Gas Cylinder Price | गॅस सिलिंडरच्या किंमती 200 रुपयांनी स्वस्त; सर्वसामान्यांना दिलासा title=

मुंबई : सर्वसामान्य जनतेसाठी जुलै महिन्याची सुरूवात चांगली झाली आहे. केंद्र सरकारने LPG Gas Cylinder च्या किंमतींमध्ये कपात केली आहे. तेल कंपन्यांनी 19 किलो गॅस सिलिंडरच्या दरांमध्ये 198 रुपयांची कपात केली आहे. नवीन किंमती 1 जुलै म्हणजेच आजपासून लागू करण्यात आल्या आहेत. इंडियन ऑइल ऑइलचा 19 किलोग्रॅमचा कमर्शिअल गॅस सिलिंडर आता 2021 रुपयांना मिळणार आहे. याआधी 1 जून रोजी किंमतींमध्ये 135 रुपये कमी करण्यात आले होते. 14.2 किलोच्या घरघुती सिलिंडरच्या किंमतीत कोणतेही बदल करण्यात आलेले नाही. 

सिलिंडरच्या किंमती?

  • 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर आजपासून म्हणजेच 1 जुलैपासून 200 रुपयांनी स्वस्त झाला आहे.
  • दिल्लीत आता 19 किलोचा सिलेंडर 2219 ऐवजी 2021 रुपयांना मिळणार आहे.
  • कोलकातामध्ये 2322 रुपयांऐवजी 2140 रुपयांना मिळणार आहे.
  • मुंबईत 2171.50 रुपयांऐवजी 1981 रुपयांना मिळणार आहे.
  • चेन्नईमध्ये 19 किलोचा सिलेंडर 2373 रुपयांऐवजी 2181 रुपयांना मिळणार आहे.

तेल कंपन्यांनी दिलेल्या या सवलतीचा परिणाम आगामी काळात महागाईवर दिसून येईल. यापूर्वी 1 जून रोजी 19 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत 135 रुपयांनी कपात करण्यात आली होती. त्याचवेळी मे महिन्यात घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरचे दर दोनदा वाढवण्यात आले होते.

7 मे रोजी घरगुती सिलिंडरचे दर (LPG Cylinder Price) 50 रुपयांनी वाढले होते. त्याच वेळी, 19 मे रोजी 3.50 रुपयांची वाढ करण्यात आली. मात्र, सध्या दरात कोणतीही कपात झालेली नाही.

200 रुपये अनुदान 
1 जूनपासून घरगुती एलपीजीच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. परंतु, काही दिवसांपूर्वीच जनतेला मोठा दिलासा देत सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत प्रति सिलेंडर 200 रुपये गॅस सबसिडी जाहीर केली होती. ही सबसिडी वर्षाला 12 सिलिंडरवर मिळणार आहे.