रामराजे शिंदे, झी मीडिया, नवी दिल्ली : राजकीय वर्तुळातून (Political News) या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. मुख्यमंत्री सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. (maharashtra cm eknath shinde meet home minister amit shah)
मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांमध्ये तब्बल 40 मिनिटं ही चर्चा झाल्याचं समजतंय. तसेच या चर्चेत महाराष्ट्रातील परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग दर्शवला. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.
दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात देशाच्या कानाकोपऱ्यातुन आलेले शिवसेनेचे सर्व प्रदेश प्रमुख उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. pic.twitter.com/hiJt1nO3EO
— Eknath Shinde - एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 22, 2022
दिल्लीतील महाराष्ट्र सदनात देशाच्या कानाकोपऱ्यातुन शिवसेनेचे सर्व प्रदेश प्रमुख उपस्थित होते. या सगळ्यांनी मिळून वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.