पोरबंदर : गुजरातमध्ये निवडणुकीचे वातावरण असल्याने राहूल गांधी आणि अमित शहा यांसारख्या बड्या नेत्यांनी नुकताच गुजरात दौरा केला. मात्र आपल्या प्रचार सभांमध्ये व्यस्त असलेल्या या नेत्यांचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याकडे लक्ष गेल्याचे दिसत नाही. पोरबंदर येथील चौकात उभारण्यात आलेल्या गांधीजींच्या पुतळ्याला चष्मा घातलेला नाही. विशेष बाब म्हणजे गेल्या तीन दिवसांपासून पुतळा याच अस्वस्थेत आहे. अद्याप स्थानिक प्रशासनाचेही त्याकडे लक्ष गेलेले नाही. ट्विटरवर या पुतळ्याचे छायाचित्र प्रसिद्ध झाल्यानंतर त्याबद्दल चर्चा सुरु झाली.
पोरबंदर शहरातील मानेक चौकात हा पुतळा आहे. गांधीजींची प्रत्येक प्रतिमा अथवा पुतळा हा चष्मा घातलेल्या अवस्थेतच असतो. गोल काचांच्या फ्रेमचा चष्मा ही गाधींजींची ओळख बनला आहे. केंद्र सरकारने सुरु केलेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानाचे चिन्ह देखील गांधीजींचा चष्मा आहे. मात्र, चष्मा नसलेला गांधीजींचा पुतळा खुद्द त्यांच्याच जन्मभूमीत गुजरातमध्ये उभारण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
#Gujarat: Spectacles missing from Mahatma Gandhi's statue at Porbandar's Manek Chowk for the last three days. pic.twitter.com/cWkArjMV9K
— ANI (@ANI) October 3, 2017