माहेरहून येण्यास पत्नीने दिला नकार त्यानंतर पतीने उचललं हे पाऊल

पती-पत्नीचं एकमेकांवर प्रेम तर असतचं त्याचप्रमाणे दोघांत भांडणही होत असतात. पण, रायबरेलीमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 

Sunil Desale Sunil Desale | Updated: Oct 7, 2017, 09:40 PM IST
माहेरहून येण्यास पत्नीने दिला नकार त्यानंतर पतीने उचललं हे पाऊल title=
Representative Image

रायबरेली : पती-पत्नीचं एकमेकांवर प्रेम तर असतचं त्याचप्रमाणे दोघांत भांडणही होत असतात. पण, रायबरेलीमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. 

पत्नीने माहेरहून सासरी परत येण्यास नकार दिल्याने एका व्यक्तीने आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना उत्तर प्रदेशातील रायबरेजी जिल्ह्यात घडली आहे.

रायबरेली जिल्ह्यातील आलमपुर येथे राहणाऱ्या सुनिल कुमार पासी याचं पुष्पा सोबत लग्न झालं होतं. त्या दोघांना एक पाच वर्षांचा मुलगाही आहे. पण, पुष्पा आपल्या मुलासोबत गेल्या अनेक दिवसांपासून माहेरीच राहत होती. आपली पत्नी आणि मुलाला आणण्यासाठी सुनिल अनेकदा गेला. मात्र, पुष्पाने त्याच्यासोबत सासरी येण्यास नकार दिला.

सासरी येण्यास नकार देणाऱ्या पुष्पाचं आणि सुनिलचं अनेकदा भांडणही झालं होतं. शुक्रवारी रात्री दोघांमध्ये याच विषयावरुन फोनवर वाद झाला. त्यानंतर रागाच्या भरात सुनिलने एका कार्यक्रमाला जात असल्याचं सांगून घरातून निघून गेला. मात्र, सुनिल घरी परतलाच नाही. त्याने रात्री उशीरा लालगंज रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनसमोर येऊन आत्महत्या केली.

शनिवारी सकाळी सुनिलचा मृतदेह पोलिसांना आढळल्यानंतर याची माहिती घरातील सदस्यांना देण्यात आली. मृत सुनिलच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची सून सासरी परत येत नसल्याने सुनिल खूपच नाराज आणि दु:खी होता. तो अनेकदा पुष्पाला आणण्यासाठी गेला मात्र, तिने परत सासरी येण्यास नकार दिला.