ऐकावे ते अजब! ७५ वर्षीय वृद्धाने केले काठीसोबत लग्न

एका अजब लग्नाची गोष्ट चर्चेचा विषय झालेय. ७५ वर्षीय वृद्धाने विवाह केला. या वृद्धाने असं का केले, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 1, 2018, 04:43 PM IST
ऐकावे ते अजब! ७५ वर्षीय वृद्धाने केले काठीसोबत लग्न title=

लखनऊ :  उत्तर प्रदेशात एका लग्नाची गोष्ट चर्चेचा विषय झालेय. कौशाम्बी जिल्ह्यात एका व्यक्तीने काठीच्या तुकड्यासोबत लग्न केले. ७५ वर्षीय वृद्धाने असा विवाह केल्याने जोरदार चर्चा आहे. या वृद्धाने असं का केले, याची उत्सुकता सगळ्यांना लागलेय.

Man marry with wooden bride

बाकरगंज गावातील ७५ वर्षीय वृद्धाने महिलेसोबत लग्न न करता कापसाच्या काठीसोबत लग्न केले. 

Man marry with wooden bride

काठीच्या तुकड्याला एका सर्व सामान्य महिलेप्रमाणे साडीचा पेहराव केला गेला. तर वराने नवीन कपडे परिधान केले होते. त्यानंतर हिंदू रिती-रिवाजाप्रमाणे दोघांचे लग्न लावण्यात आले.

Man marry with wooden bride

दरम्यान, ज्या गावात हे लग्न लावले गेले त्या गावात  (अविवाहीत अर्थात कुवारा) कुवारा लोकांना मुखाग्नी न देण्याची प्रथा आहे. ज्या व्यक्तीने काठीसोबत लग्न केले त्याचे नाव दुर्गा प्रसाद असल्याचे सांगितले जात आहे. संपूर्ण घरातील कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे दुर्गा प्रसाद यांनी लग्न केलेले नाही.

Man marry with wooden bride

त्यामुळे त्यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्याची परंपरा कायम राहावी, म्हणून त्यांच्या कुटुंबातील लोकांनी त्यांना लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांनी काठीच्या प्रतिकात्मक फोटोसोबत लग्न केले. गावातील लोकांचे म्हणणे आहे की, हिंदू धर्मात विना मुख्याग्नीचे अंतिम संस्कार पूर्ण होत नाही. त्यामुळे त्यांनी लग्न करणे महत्वपूर्ण आहे.