Marriage Viral News : झारखंडमधील कोडरमा झुमरी तिलैया या गजबजलेल्या झंडा चौकात दोन तरुणींनी एका तरुणावर आपला पती असल्याचा दावा केला आणि त्यावेळी मोठा गोंधळ उडाला. या सगळ्या गोंधळात घटनास्थळी पोलीस पोहोचले. त्यानंतर हा मामला पोलीस ठाण्यात पोहोचला. 'एक फूल दोन माळी' ही म्हण तुम्ही ऐकली असेल, पण 'एक माळी आणि दोन फूल', असे क्वचितच ऐकायला मिळते. प्रत्यक्षात कोडरमाच्या झुमरी तिलैया येथील झंडा चौकात अचानक गोंधळ सुरु झाला. काय हा प्रकार आहे, हे समजून घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली.
दोन महिला रस्त्यात अशा का भांडत आहेत, हे जाणून घेण्याचा काहींनी प्रयत्न केला. त्यावेळी कळले की एकच तरुण दोघींचा नवरा होता.तसा दोघींनी दावा केला. हा माझा आहे, त्याच्यावर माझाच हक्क आहे, असे सांगत दोन महिला एकमेकांशी भांडत होत्या. भर रस्त्यात हे प्रकरण वाढल्यावर लोकांनी या गोंधळाची माहिती पोलिसांना दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून गोंधळ घालणाऱ्या महिला आणि युवकाला पोलीस ठाण्यात नेले.
ज्या दोन महिला भांडत करत होत्या त्या युवकाच्या वडिलांनी याबाबत स्पष्टीकरण दिलेय. त्या व्यक्तीचे वडील बच्चू राम यांनी सांगितले की, 2015 मध्ये त्यांचा मुलगा संदीप राम याने डोमचांच येथील रहिवासी गुडिया देवीसोबत प्रेमविवाह केला होता, त्यांना तीन मुलेही आहेत. मात्र आता दुसऱ्या महिलेने संदीप याने तिच्याशी लग्न केल्याचा दावा करत आहे. दुसरीकडे, संदीपची पहिली पत्नी गुडिया हिने सांगितले की, तिने कुटुंब आणि समाजाच्या विरोधात जाऊन संदीप याच्यासोबत प्रेमविवाह केला आणि त्यानंतर दोघेही आनंदाने राहत होते.
संदीप मुंबईतील एका हॉटेलमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत आहे. तीन दिवसांपूर्वी गुडिया हिचा नवरा मुंबईहून परतला तेव्हा त्याने पूजाला सोबत आणले आणि गुडियाशी कोणतेही संबंध नसल्याचे स्पष्टपणे नाकारले. संदीप याला गुडिया आणि पूजा या दोघींनाही सोबत ठेवायचे होते, पण गुडियाला यामुळे चीड आली आणि त्या दोघींनी भर रस्त्यात गोंधळ घातला.
आपण ज्याच्याशी सर्वांच्या विरोधात लग्न केले तोच पती दुसऱीसोबत पाहून गुडियाला वाईट वाटले. पतीच्या या कृत्याने गुडिया संतापली आणि तिने झंडा चौकातील गजबजलेल्या परिसरात गोंधळ घातला आणि मोठा ड्रामा झाला. त्यानंतर अखेर हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी तिघांनाही पोलीस ठाण्यात नेऊन चौकशी केली.