मथुरा: भरधाव टँकरनं कारला भीषण धडक दिल्याची घटना यमुना एक्स्प्रेस वेवर घडली आहे. रात्री उशिरा हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अनियंत्रित झालेल्या भरधाव टँकरनं इनोव्हा कारला धडक दिली. मथुरा इथल्या नौहझील परिसरात माईल स्टोन 68 जवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
यमुना एक्स्प्रेस वेवर रात्री उशिरा या अपघाताची माहिती मिळाली. HR69-3433 क्रमांक असलेला टँकर भरधाव वेगात होता. चालकाचं ट्रकवरचं नियंत्रण सुटलं आणि दुभाजक तोडून टँकर उलटला. या टँकरची इनोव्हा समोरून येणाऱ्या इनोव्हा कारला धडक बसली आणि कारमधील 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका गंभीर होता की इनोव्हा कारचा चुराडा झाला.
Seven persons including two women died after an oil tanker collided with the car they were travelling in, on Yamuna Expressway. Bodies have been recovered and sent for post-mortem: Mathura SSP Gaurav Grover pic.twitter.com/fbpsAwQL23
— ANI UP (@ANINewsUP) February 23, 2021
या अपघातात 45 वर्षीय मनोज, त्यांची पत्नी बबिता, मुलगा अभय आणि हेमंत आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, एक्स्प्रेस वे कर्मचारी आणि बचाव दल घटनास्थळी दाखल झाले. डीएम नवनीत चहल आणि एसएसपी गौरव ग्रोव्हरही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी गाडीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास सुरुवात केली.