आता एवढच पाहायच राहिल होतं...हॉटेलच नाव पाहून नेटकरी असं काय म्हणतायत?

'मेले बाबू ने थाना थाया'...भावाने इतकं मनावर घेतलं की हॉटेलच उघडलं, हॉटेलची एकच चर्चा

Updated: Nov 27, 2022, 12:00 AM IST
 आता एवढच पाहायच राहिल होतं...हॉटेलच नाव पाहून नेटकरी असं काय म्हणतायत? title=

मुंबई : सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक फोटो (Photo) आणि व्हिडिओ (Video) व्हायरल होत असतात. या फोटोंनी प्रेक्षकांचे खुप मनोरंजन होत असते. असाच एक मनोरंजन करणारा फोटो समोर आला आहे. या फोटोची एकच चर्चा रंगली आहे. या फोटोमध्ये एक हॉटेल (Hotel) दिसत आहे. या हॉटेलचे नाव पाहून अनेकांना हसू आवरता येत नाहीए. 

फोटोत काय? 

फोटोत एक हॉटेल (Hotel) दिसत आहे. या हॉटेलवर एक बोर्ड (Hotel Photo viral) लावण्यात आला आहे. या बोर्डवर हॉटेलच्या नावासह क़ॉन्टॅक्ट नंबर आणि कोणती सर्विस देत आहेत, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. यासोबत या बोर्डवर जेवणाचे काही फोटो लावण्यात आले आहेत. या बोर्डचा फोटो आता व्हायरल होत आहे.

हे ही वाचा : एकुलत्या एक मुलाचं लग्न ठरलं! वरातीऐवजी काढावी लागली अत्यंयात्रा, घटना वाचून धक्का बसेल

व्हायरल का होतेय?

हॉटेलच बोर्ड व्हायरल (Hotel Photo viral) होण्यामागचं कारण काय असा प्रश्न अनेकांना पडला असेल. तर त्याच असं झालंय की या हॉटेलचे नाव 'मेले बाबू ने थाना थाया' असे आहे. त्यामुळे अनेकांना हसू येत आहे. कारण अनेक मुली आपल्या बॉयफ्रेंडशी (Boyfriend) प्रेमाने बोलण्यासाठी अशा प्रकारचे शब्द वापरत असतात. याबाबतचे रिल देखील इन्स्टावर आपण पाहिलेच असतील. त्यामुळे ते खुप मनोरंजक वाटतेय. 

हे ही वाचा : बेल्जियमची तरूणी भारताची सून, रिक्षावाल्याशी बांधली लगीनगाठ 

दरम्यान हे हॉटेल (Hotel Photo viral) इंदोरमध्ये उघडण्यात आले आहे. या हॉटेलचे अशाप्रकारे नाव ठेवून मालकाने एकच चर्चा उडवून दिली आहे. त्यामुळे या हॉटेलचे फोटो (Hotel Photo) सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यासोबतच अनेकजण खरचं अशाप्रकारचं हॉटेल आहे का? हे पाहण्यासाठी तेथे पोहोचत आहे.

सध्या या हॉटेलचा फोटो (Hotel Photo) सोशल मीडियावर (Social media) व्हायरल होत आहे. हा व्हायरल फोटो पाहून प्रेक्षकांना हसू आवरता येत नाही आहे.