नवी दिल्ली : मोदी सरकारने सर्वसामान्यांना कमाई करण्याची एक संधी आणली आहे. यामाध्यमातून तुम्हाला केंद्रासाठी काही काम करायचे आहे.
त्याचे तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंतचे बक्षिस मिळू शकेल.
डिजिटल पेमेंटसाठी मोदी सरकार प्रयत्नशिल आहे. यामध्ये अजून एक पाऊल पुढे टाकत डिजिटल पेमेंट जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्र सरकार सिग्नेचर टोन, लोगो आणि टॅगलाईन तयार करु इच्छित आहे.
यासाठी सरकारतर्फे विशेष तज्ञांची मदत घेतली जात आहे. सर्व सामान्य नागरिकांनाही यामध्ये सहभागी केले जाणार आहे.
जर तुम्हाला संगीत क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही सिग्नेचर टोन बनवून सरकारची मदत करु शकता.
जर तुम्हाला चांगल्या ओळी सुचत असतील किंवा चांगला लोगो डिझाइन करता येत असे तर सरकारसाठी टॅग लाइन लिहू शकता.
असे काम करणाऱ्यांना सरकारतर्फे बक्षिसरुपी रक्कम दिली जाणार आहे.
सर्वात चांगली सिग्नेचर टोन बनवणाऱ्या व्यक्तीस १० हजार रुपयांपर्यंतचे बक्षिस देण्यात येणार आहे.
यानंतर इतर दोघांनाही ५ हजार आणि ३ हजार पर्यंतचे बक्षिस देण्यात येणार आहे.
लोगो आणि टॅगलाईनबद्दल बोलूया. सर्वात चांगल्या टॅग लाईन बनविणाऱ्यास २० बजार रुपयांपर्यंत बक्षिस मिळू शकते.
यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या नंबरावर असणाऱ्यास १५ हजार आणि ७,५०० पर्यंतचे बक्षिस मिळू शकते.
दोन्ही आयोजनात हिस्सा घेऊ इच्छिणाऱ्यांकडे ५ डिसेंबर पर्यंतची वेळ आहे.
त्यामूळे तुम्ही आतापासूनच याच्या तयारीला लागा आणि आपल्या टॅलेंटचा योग्य वापर करा.
यासंबंधी अधिक माहितीसाठी Mygov.in वर जाऊ शकता. कार्यक्रमाच्या आयोजनापासून संपूर्ण माहिती तुम्हाला यामार्फत मिळणार आहे.
आपली एन्ट्री पाठविण्याआधी याच्याशी संबंधित नियम आणि अटी नक्की वाचा.