राष्ट्रीय एकता दिवस : लोहपुरूषाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान गुजरातमध्ये

PM मोदींची 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'ला भेट 

Updated: Oct 31, 2019, 07:43 AM IST
राष्ट्रीय एकता दिवस : लोहपुरूषाला श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान गुजरातमध्ये  title=

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुरूवारी सरदार वल्लभभाई पटेल यांची 144 वी जयंती साजरी करणार आहे. गुजरातमधील केवडियामध्ये असलेल्या 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' (Statue of Unity) जाऊन श्रद्धांजली अर्पित करणार आहेत. या कार्यक्रमामुळे परिसरात कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. 

गुरूवार सकाळी पंतप्रधान मोदी नर्मदा जिल्ह्यातील केवडिया पोहोचणार. तिथे ते सर्वात अगोदर सरदार सरोवर बांधाजवळ असलेल्या 182 मीटर उंचीच्या 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' येथे जाणार आणि भारताचे लोह पुरूषाला श्रद्धांजली वाहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गुजरातचा दोन दिवसीय दौरा आहे. पीएम मोदी गुरूवारी सकाळी स्टॅच्यू ऑफ युनिटी जाऊन वेगवेगळ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. 

राष्ट्रीय एकता दिवस 

2014 पासून दरवर्षी 31 ऑक्टोबर हा दिवस  'राष्ट्रीय एकता दिवस' (National Unity Day) म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अनेकजण 'रन फॉर युनिटी'(Run for Unity) मध्ये सहभाग घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्या 'रन फॉर युनिटी' पार पडणार आहे. त्यासाठी रंगारंग तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी गुजरात दौऱ्यावर आहेत. सकाळी पावणे आठ च्या सुमाराला पंतप्रधान मोदी स्टेच्यू ऑफ़ यूनिटी इथे सरदार पटेल य़ांना पुष्पांजली अर्पण करतील. त्यानंतर एकता दिवस परेडला सुरुवात होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात'मध्ये या 'रन फॉर युनिटी'मध्ये मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन केलं. 'रन फॉर युनिटी'नंतर पंतप्रधान पावणे दहाच्या सुमाराला शस्त्र आणि सेनेच्या एका प्रदर्शनाचं उद्घाटन करतील. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध ठिकाणी रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आलंय. त्यासाठी RUNFORUNITY.GOV.IN या वेब पोर्टलवर रन फॉर युनिटीच्या आयोजनासंदर्भात माहिती मिळणार आहे.