Crime News : आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले

घरात आग लागल्यावर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळवल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण घरात तपास केला यावेळी पोलिसांना नोटांचे घबाड सापडले. 

वनिता कांबळे | Updated: May 14, 2023, 06:55 PM IST
 Crime News :  आग लागली म्हणून पोलीस घरी दाखल झाले; पण, बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून डोळे फिरले  title=

Hyderabad Crime News : हैदराबादमधील सिकंदराबादमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका घरात भीषण आग लागली होती. आगीचे वृत्त समजताच पोलिस अग्नीशमन दलाच्या जवानांना घेवून तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी या घराच्या बेडरुममध्ये जे दिसलं ते पाहून पोलिस शॉक झाले.  बेडरुमचा दरवाजा उघडला असता पोलिसांना नोटांचे घबाड सापडले. हा हवेला रॅकेटचा पैसा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. 

बेडरुमचा दरवाजा पोलिसांनी उघडला असता पोलिसांना मोठा धक्का बसला

हैदराबाद येथील सिकंदराबाद येथील रेजिमेंटल बाजार येथील एका घराला आग लागली. स्थानिकांनी तात्काळ पोलिसांना याबद्दल कळवले. पोलिस अग्नीशमन दलाच्या जवानांना घेवून तात्काळ घटनास्थळी पोहचले. अग्नीशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आघीवर नियंत्रण मिळवले. यांनतर अजून कुणी घरात कुठे अडकले तर नाही नाही यासाठी पोलिसांनी संपूर्ण घर तपासले. या तपासणी दरम्यान घरातील एका बेडरुमचा दरवाजा पोलिसांनी उघडला असता त्यांना मोठा धक्का बसला. 

बेडरुममध्ये असे होते तरी काय?

बेडरुमचा दरवाजा उघडला असता पोलिसांना मोठ्या प्रमाणात नोटांचे बंड आणि सोन्या, चांदीचे दागिने आढळून आले. एकूण 1 कोटी 64 लाखांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. तर, सोन्या, चांदीच्या दागिन्यांची किंमतही कोट्यावधीच्या घरात असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

रोकड कुणाची?

ज्या घरात आग लागली ते घर श्रीनिवास नावाच्या व्यक्तीच्या मालकीचे असल्याचे समजते. ते एक व्यावसायिक आहेत. घराला आग लागली तेव्हा श्रीनिवास हैदराबादमध्ये उपस्थित नव्हते. पोलिसांनी श्रीनिवास यांच्य घरात सापडलेली कोट्यावधीचे दागिने आणि रोकड जप्त केली आहे. हा हवालाचा पैसा असावा असा पोलिसांना संशय आहे.

हवालाद्वारे मुंबई येथे पाठविण्यात येत असलेली कोट्यावधीची रोकड जप्त

हवालाद्वारे मुंबई येथे पाठविण्यात येत असलेली साडे बारा लाखाची रोकड अकोल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी उमेश माने पाटील यांच्या पथकाने काही दिवसांपूर्वी जप्त केली होती. रेल्वे स्थानक परिसरात 12 लाख 50 हजार रूपयांची रोकड मुंबई येथे पा़ठविण्यात येत असल्याची माहिती समजताच ही कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे एवढी मोठी रक्कम कुठून आली, याबाबत पोलीस तपास सुरु केला होता. या माध्यमातून हवाल्याचं  एक मोठं रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जातेय.