हलगर्जीपणा! या राज्यामध्ये 1 लाखांहून अधिक लसींचे डोस गेले वाया

लस वाया  वाया जाण्याचा मुद्दा चर्चेत आहे. 

Updated: Jul 29, 2021, 01:14 PM IST
हलगर्जीपणा! या राज्यामध्ये 1 लाखांहून अधिक लसींचे डोस गेले वाया title=

मुंबई : कोरानाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी देशात लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. सध्या देशाभरात कोरोना लसीकरणाचं देखील वेगाने सुरू आहे. आतापर्यंत 45 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आलेले आहेत. काहींचे एक दोन डोस तर काही नागरिकांना लसीच्या तुटवड्यामुळे लस मिळाली नाहीये. अशातच लस वाया  वाया जाण्याचा मुद्दा चर्चेत आहे. 

लस वाया जाण्याच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने संसदेमध्ये उत्तर दिलं आहे की, जुलैपर्यंत बिहारमध्ये जास्तीत जास्त लस वाया गेल्याचं समोर आलं आहे. 1 मे 2021 ते 13 जुलै या कालावधीत देशात सुमारे 2.5 लाख लसींचे डोस खराब झाले आहेत त्या राज्यांमध्ये बिहार, जम्मू -काश्मिर, त्रिपुरा, दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, मणिपूर आणि मेघालय यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये 1.26 लाख, दिल्लीत 19 हजार, जम्मू-काश्मीरमध्ये 32 हजार, मणिपूरमध्ये 12 हजार, मेघालयात 3500, पंजाबमधील जवळपास 13 हजार, त्रिपुरामध्ये 27 हजार तर उत्तर प्रदेशातील सुमारे 13 हजार लसींच्या डोसांचं नुकसान झालं आहे.

या राज्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही राज्यातील लसी वाया गेलेली आकडेवारी सरकारकडून देण्यात आलेली नाही. आतापर्यंत सुमारे 42 लाख अतिरिक्त लसींचे डोस सरकारने सर्व राज्यांना दिले आहेत. आतापर्यंत एकूण 45,07,06,257 डोस लस देण्यात आले आहेत. लसीकरणाच्या बाबतीत उत्तर प्रदेश, महाराष्ट्र यांसारखी राज्यं आघाडीवर आहेत.