Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली

Mukesh Ambani Deal : रिलायन्स रिटेलसोबतच्या कराराची घोषणा झाल्यापासून चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. आज या शेअर्सनी उच्चांक गाठला असून एकूणच चॉकलेट कंपनीच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून येत आहे.   

Updated: Feb 3, 2023, 04:15 PM IST
Mukesh Ambani Deal: तिथे अदानी तोट्यात, इथे अंबानींच्या गुंतवणूकदारांना छप्परफाड फायदा; पाहा अशी काय डील झाली

Multibagger Stock: अमेरिकेच्या शॉर्ट-सेलिंग फर्म असलेल्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या (Hindenburg Research) अहवालामुळे अदानी ग्रुप संकटात सापडला आहे. त्यामुळे अदानी ग्रुपने मार्केटमधून एक्झिट घेतली आहे. तर दुसरीकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याशी झालेल्या करारानंतर  लोटस चॉकलेट कंपनीचे (लोटस) शेअर्स सतत अपर सर्किटवर आहेत. गेल्या एका महिन्यात या कंपनीच्या शेअरमध्ये 312 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे अदानी तोट्यात असताना मुकेश अंबानींच्या गुंतवणूकदापांना मात्र छप्परफाड फायदा होताना दिसत आहे.

आजही अप्पर सर्किट

लोटस चॉकलेट कंपनीच्या शेअर्सनी सलग 52 व्या आठवड्यातही विक्रमी उच्चांक गाठला. कंपनीचे शेअर एका महिन्यात 96 रुपयांवरून 395.35 रुपयांपर्यंत पोहचले आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक 1 महिन्यात 312 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे.  लोटस आइस्क्रीम कव्हरिंग्स कोको डेरिव्हेटिव्ह्ज आणि चॉकलेट उत्पादने (शुद्ध चॉकलेट तसेच कंपाऊंड प्रकार दोन्ही) च्या उत्पादन, व्यापार, विक्री, आयात आणि निर्यात या व्यवसायात अग्रेसर आहे.  

वाचा: Hindenburg च्या साडेसातीनंतर अदानींच्या शेअर्सना 'अच्छे दिन'

रिलायन्ससोबत करार

काही आठवड्यापूर्वी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी, कंपनीच्या शेअर्सने अपर सर्किट गाठले होते आणि शेअर्सची किंमत 199.95 वर पोहोचली होती. यानंतर, आज पुन्हा त्याच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी नोंदवली गेली आणि त्याला अप्पर सर्किट लागले. डिसेंबर 2022 च्या शेवटच्या आठवड्यात, रिलायन्स रिटेलने या चॉकलेट कंपनीचे 51 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली होती. या वृत्तानंतर कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी पाहायला मिळत आहे. तसेच ईशा अंबानीने रिलायन्स रिटेल वेंचर्सची जबाबदारी स्विकारली आहे. रिटेल सेक्टरमध्ये मुकेश अंबानीं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करत आहेत, रिलायन्स रिटेल आणि लोटस चॉकलेटदरम्यान 8.94 दशलक्ष डॉलर्ससाठी करार करण्यात आला आहे. या करारासाठी 113 रुपये प्रती शेअर्सचा भाव निश्चित करण्यात आला आहे. चॉकलेट कंपनी लोटसची स्थापना 1988 मध्ये झाली होती. ही कंपनी कोका आणि चॉकलेट उत्पादनाचा पुरवठा करते.