नवीन वर्षात मुकेश अंबानी सुरू करतील 'हे' नवे बिझनेस...

रिलायन्स जिओ लॉन्च केल्यानंतर 2017 हे वर्ष मुकेश अंबानींसाठी खूप चांगले ठरले. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Dec 30, 2017, 03:33 PM IST
नवीन वर्षात मुकेश अंबानी सुरू करतील 'हे' नवे बिझनेस... title=

नवी दिल्ली : रिलायन्स जिओ लॉन्च केल्यानंतर 2017 हे वर्ष मुकेश अंबानींसाठी खूप चांगले ठरले. जिओने यंदाच्या वर्षी चांगलीच कमाई केली. 2G/ 3G तून पुढे जात त्यांनी ग्राहकांना  4G ची सुविधा देली. जिओ नंबर वन ठरल्यानंतर मुकेश अंबानी नव्या बिजनेस सुरू करण्यासाठी सज्ज झाले आहेत. 2018 मध्ये रिलायन्स इंडस्ट्री ओला-उबर सारख्या टॅक्सी सेवेत पाऊल टाकेल. त्याचबरोबर पेमेंट बॅंक देखील सुरू करणार आहे. 

जिओ पेमेंट बॅंक

जिओ पेमेंट बॅंक ऑक्टोबर 2017 मध्ये लॉन्च करण्याची योजना होती. या बॅंकेच्या लॉन्चने मोदी सरकारच्या कॅशलेस योजनेला प्रोत्साहन मिळेल.  देशातील सर्वात मोठ्या सरकारी बॅंक एसबीआयसोबत संयुक्तपणे ही जिओ पेमेंट बॅंक लॉन्च करण्यात येईल.

कॅब सर्व्हिस

मीडिया रिपोर्टसनुसार, पुढच्या वर्षी रिलायन्स जिओ ओला आणि उबर सारखी आपली कॅब सर्व्हिस सुरू करू शकतात. 

क्लीन एनर्जी

नवीन वर्षात रिलायन्स जिओ सोलार एनर्जी क्षेत्रात प्रवेश करण्याची घोषणा करू शकते.