अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Feb 28, 2018, 11:45 PM IST
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक title=

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह एकाच गाडीत रवाना झाले होते. तर नारायण राणे सुद्धा अमित शाह याच्या भेटीला गेले आहेत. त्यामुळे या भेटीतून राणेंना काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. रात्री उशिरा अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि राणे यांच्यात बैठक सुरू आहे. 

राणे राज्यसभेवर

गेले अनेक महिने मंत्रिपदासाठी भाजपानं झुलवत ठेवलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राज्यसभा उमेदवारीची चर्चा आता सुरू झालीये. राणे आज अचानक दिल्लीत दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही भाजपाच्या मुख्यमंत्री परिषदेसाठी राजधानीतच आहेत. शिवाय भाजपा अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीही सध्या दिल्लीत आहेत. 

अशी असेल खेळी?

नेमकी हीच वेळ साधून राणे दिल्लीत पोहोचलेत. पुढल्या महिन्यात राज्यातल्या राज्यसभेच्या ६ जागा रिक्त होत आहेत. विधानसभेतल्या संख्याबळानुसार भाजपाचे ३ खासदार निवडून येऊ शकतात. त्यामुळे भाजपाच्या कोट्यातून राणेंची वर्णी लागण्याची शक्यता आता वर्तवली जातेय. मात्र आपल्या दिल्लीवारीत राणे कुणाची भेट घेणार, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.