...आणि नितीन गडकरी संतापले

...

Updated: Jun 10, 2018, 02:26 PM IST

नवी दिल्ली : शेहला रशीद हिच्या वादग्रस्त ट्विटवर केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता कायदेशीर कारवाईचे संकेत दिलेत. शेहला रशीद ही जेएनयुची माजी विद्यार्थीनी आहे.

शेहला रशीदने शनिवारी ट्विट करत, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि नितीन गडकरी यांनी पंतप्रधानांच्या हत्येचा कट रचत असल्याचे म्हटलं होतं.

शेहलाच्या ट्विटनंतर गडकरींनी लगेच ट्विट करत आपली प्रतिक्रिया दिलीय.

पंतप्रधान मोदी यांच्या हत्येच्या कटात आपलं नाव गोवणाऱ्या असामाजिक तत्वांविरुद्ध आपण कायदेशीर कारवाई करणार असल्याचे या ट्विटमध्ये म्हटलं आहे.