लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूसोबत घडला असा प्रकार, ज्याचा तिने विचार देखील केला नसावा

लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, कारण यानंतर ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असते.

Updated: May 12, 2022, 08:30 PM IST
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूसोबत घडला असा प्रकार, ज्याचा तिने विचार देखील केला नसावा title=

मुंबई : लग्न हा प्रत्येक मुलीच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण असतो, कारण यानंतर ती एका नव्या आयुष्याला सुरुवात करणार असते. ज्यामध्ये नवीन लोक आणि नवीन जागेला तिला आपलंसं करायचं असतं. शिवाय सगळ्या जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या असतात. परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री जर त्या मुलीच्या संसारात वादळ आलं तर? आपण विचार देखील करु शकत नाही. अशी घटना एका महिलेसोबत लग्नाच्या पहिल्याच रात्री घडली आहे.

कानपूर जिल्ह्यातील मंगळपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा सगळा प्रकार घडला. येथील एका गावात दिवसा विवाह सोहळा पार पडला आणि काझींनी वधू-वरांना विवाहाचा स्वीकार केला.

वधू आणि वर आनंदाने आपल्या घरी गेले. परंतु सकाळी उजाडताच वधूने आपल्या पहिल्या रात्रीचा जो काही किस्सा आपल्या घरातल्यांना सांगितला, ते ऐकून सर्वांच्याच पाया खालची जमीन सरकली.

ज्यानंतर नववधूचे वडिल पोलिसांना घेऊन आपल्या मुलीच्या सासरी पोहोचले आणि नवरदेवावर गुन्हा नोंदवला.

नक्की लग्नाच्या पहिल्या रात्री नववधूसोबत असं काय घडलं?

लग्न होऊन जेव्हा नववधू आणि नवरदेव घरी पोहोचले तोपर्यंत सर्वकाही ठिक होतं. परंतु हे दोघेही जेव्हा खोलीत गेले. तेव्हा मात्र नवरदेवाने नववधूला मारझोड करायला सुरुवात केली.  खरंतर खोलीत नववधू एकटीच गेली होती, तेव्हा नवरदेव आपल्या  मित्रांसोबत गप्पा मारत होता. अखेर नववधू त्याची वाट पाहून झोपली. रात्री उशीरा जेव्हा नवरदेव घरी आला, तेव्हा त्याने पाहिले की, नववधू झोपली होती.

नवरदेवानं नववधूला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती उठली नाही, ज्यामुळे त्याने आपल्या कमरेच्या पट्ट्याने नववधूला मारायला सुरुवात केली. ज्यामुळे नववधू खूप रडू लागली. शेवटी जेव्हा दुसऱ्या दिवशी सकाळी नववधूच्या घरच्यांचा विचारपूस करण्यासाठी फोन आला, तेव्हा तिने आपल्या नवऱ्याची वागणूक घरच्यांना सांगितली. ज्यामुळे नव्या नवरीची हळद उतरण्यापूर्वीच ती आपल्या नवऱ्यापासून वेगळी झाली आणि आपल्या माहेरी परतली.