ही एक रुपयाची नोट तुम्हाला बनवू शकते करोडपती

रोज व्यवहारांमध्ये आपल्याकडे अनेक नोटा येतात आणि जातात. आपण दुकानदाराला नोट देतो आणि तो बँकेत जावून जमा करतो.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Nov 12, 2018, 11:37 PM IST
ही एक रुपयाची नोट तुम्हाला बनवू शकते करोडपती

मुंबई : रोज व्यवहारांमध्ये आपल्याकडे अनेक नोटा येतात आणि जातात. आपण दुकानदाराला नोट देतो आणि तो बँकेत जावून जमा करतो. एका हिंदी वेबसाईटने दिलेल्या बातमीनुसार, अनेक अशा नोटा असतात ज्यांचे सीरियल नंबर खूपच अनोखे असतात. या नोटा सहज नाही मिळत. अशा नोटा जमा करण्याचा अनेकांना शौक असतो. जर तुमच्याकडे देखील अशा अनोख्या नोटा असतील तर तुम्हाला त्यातून मोठी कमाई होऊ शकते.

लाखोंना विकू शकता नोटा

ई-कॉमर्स वेबसाइट ईबे तुम्हाला ही संधी देते आहे. तुम्ही 1 रुपयापासून 1000 रुपये पर्यंतच्या नोटा लाखोमध्ये विकू शकता. आज एक रुपयेची किंमत काहीही नसली तरी पण काही नोटा याला मोठी किंमत मिळवून देऊ शकतात.

1 रुपयांची नोट 11 लाखाला

ईबे वेबसाईटवर मोंटेक सिंह अहलूवालिया यांची सही असलेली 1 रुपयांची नोट 11 लाखाला विकली गेली. ईबेवर अशा नोटांवर अधिक बोली लावली जाते. जो अधिक रुपयांची बोली लावतो त्याला ही नोट दिली जाते. अशाच प्रकारे 1000 रुपयांची नोट देखील विकली जाते.

100 रुपयांची नोट अडीच लाखाला

ईबेवर 100 रुपयांची नोट अडीच लाखाला विकली जात आहे. या नोटची खासियत अशी आहे की सीरियल नंबरच्या शेवटी 786 आणि 6 शुन्य आहेत. मिसप्रिंट असलेल्या नोटा देखील येथे विकल्या जात आहेत. काही नोटांवर सिरीयल नंबरच नाही अशा नोटा देखील येथे विक्रीस आहेत. फँसी नंबर्स 786, 500, 1000 आणि 1 सिरीअल नंबरची देखील नोट दुर्लभ असते.