जम्मू-काश्मीर: SSB कॅम्पवर दहशतवादी हल्ला

जम्मू-काश्मीरमध्ये पून्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

Sunil Desale Sunil Desale | Updated: Sep 20, 2017, 10:13 PM IST
जम्मू-काश्मीर: SSB कॅम्पवर दहशतवादी हल्ला  title=
Image: ANI

श्रीनगर : जम्मू-काश्मीरमध्ये पून्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. या हल्ल्यात एक जवान शहीद झाल्याचं वृत्त समोर येत आहे.

जम्मू-काश्मीरमधील बनिहाल परिसरात एसएसबी (सीमा सुरक्षा दल)च्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. एसएसबीची जवानांची ही तुकडी बनिहाल टनल येथील सुरक्षेचं काम पाहत होती.

दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात एक एसएसबी जवान शहीद झाला आहे तर एक जवान जखमी झाला आहे. जखमी जवानाला उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, बुधवारी अनंतनाग पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा दहशतवादी आदिल अहमद भट याला अटक केली आहे. आदिल आपल्या एका सहकाऱ्याची भेट घेण्यासाठी आला असता त्याला अटक करण्यात आली.